जळगाव प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पाठीमागे ईडी सुरूच आहे. गेल्या वर्षी जप्त केलेली पावणेसहा काेटी रुपयांची मालमत्ता दहा दिवसांत सोडावी, अशी नाेटीस ईडीने पाठवली आहे. खडसेंनी याबाबतीत मात्र दुजोरा दिला आहे.
भोसरी एमआयडीसी जमीन गैरव्यवहाराच्या आराेपानंतर ईडीकडून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंविरुद्ध कारवाईला सुरुवात केली हाेती. गेल्या वर्षी ईडीने खडसेंना नाेटीसदेखील बजावली हाेती. या नाेटिसीनंतर आगस्ट महिन्यात खडसेंची जळगाव व लाेणावळा येथील ५ काेटी ७५ लाख रुपयांची प्रॉपर्टी जप्त करण्यात आली हाेती. या प्राॅपर्टीमध्ये भाडेकरू असल्यास अथवा स्वत: निवास असल्यास दहा दिवसांत खाली करण्यासंदर्भात नाेटीस बजावली आहे. दरम्यान, आपल्या नावावर एकच प्लाॅट आहे. त्यावर बांधकामदेखील झालेले नाही. त्यामुळे रिकामा करून देण्याची गरज नसल्याचे खडसेंनी सांगितले.