Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

यावलचे निवासी नायब तहसीलदार आर के पवार यांचा सेवानिवृत्तीपर सोहळा

by Divya Jalgaon Team
May 31, 2022
in सामाजिक
0
यावलचे निवासी नायब तहसीलदार आर के पवार यांचा सेवानिवृत्तीपर सोहळा

यावल (प्रतिनिधी) – आपल्या शासकीय सेवेच्या प्रति कर्तव्यनिष्ठ कार्यतत्पर सर्वसामान्यांच्या कार्यासाठी प्रशासकीय पातळीवरील प्रश्न सोडविण्यासाठी सेवा भावीवृत्तीने हसतमुखाने सदैव अग्रस्थानी राहणारे यावलच्या तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार आर के पवार हे आपल्या ३६ वर्षाच्या प्रर्दीघ शासकीय सेवेतुन उद्या दिनांक ३१ मे २०२२रोजी सेवानिवृत्त होत आहे.

यावल तहसील कार्यालयात कार्यरत असलेले निवासी नायब तहसीलदार आर के पवार मुळ राहणारे आभोडे खु॥ तालुका रावेर यांचे प्राथमिक शिक्षण पाल आणी सरदार जी जी हायस्कुल रावेर व माध्यमिक शिक्षण जळगाव येथे नुतन मराठा कॉलेज व वसंतराव नाईक कॉलेज औरंगाबाद येथे झाले .दिनांक १ / १ / १९८६ वर्षात त्यांची तलाठी म्हणुन पाचोरा येथून सुरुवात झाली , त्या नंतर त्यांनी तलाठी म्हणुन १९८९ते १९९५पर्यंत खिरोदा तालुका रावेर , १९९५ते १९९७या वर्षात सावदा तालुका रावेर , १९९७ते २००१ निंबोल ता. रावेर , २००१ते २००२ मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी व २००३ते २००५पर्यंत सतत पाच वर्ष त्यांनी रावेर शहर तलाठी पदावर शासकीय सेवा बजावली याच कार्यकाळात त्यांना विजयकुमार गावीत जिल्ह्याचे हे पालकमंत्री असतांना त्यांच्या हस्ते आदर्श तलाठी पुरस्काराने सन्मान मिळाले , यानंतर ते २००८ते २०११या कालावधीत त्यांनी फैजपुर शहर तालुका यावल येथे तलाठी पदाचे कार्य सांभाळले , पुनश्च त्यांनी २०१२या वर्षात ऐनपुर तालुका रावेर येथे सेवा बजावली , २०१२याच वर्षात त्यांना मंडळ अधिकारी या पदावर पदोन्नती मिळाल्याने त्यांनी २०१२ते १३या काळात नाडगाव तालुका मुक्ताईनगर येथे सेवा बजावली , २०१३ते १७या काळात त्यांनी खानापुर तालुका रावेर येथे सेवाकार्य केले.

भुसावळ येथे २०१८ पर्यत पदोन्नतीवर त्यांनी तालुका करमणुककर अधिकारी म्हणुन सेवेत कार्य केले . यावल येथे श्री व्यास महाराज यांच्या तपोभुमीवर व मनुमातेच्या कशीत पदोन्नतीवर त्यांनी निवासी नायब तहसीलदार या पदावर दिनांक २०१९ते ३१मे २२पर्यंत त्यांनी चार वर्ष उत्कृष्ठ अशी प्रशासकीय सेवा बजावली असुन , शासकीय सेवापुर्ती नंतरचे आपले पुढील आयुष्य आपण आपल्या जन्मभुमीत असलेल्या आभोडे गावात शेती व कुटुंबा सोबत घालविणार असल्याचे त्यांनी सांगीतले .२०२०ते २१या दोन वर्षाच्या कोरोना संसर्गाच्या अतिशय धोकादायक काळात नागरीकांची सेवा करणारे एक उत्कृष्ठ सेवाभावी अधिकारी म्हणुन आर के पवार यांनी लक्ष वेधणारे उल्लेखनिय कार्य करून नांवलौकीक मिळवले.

Share post
Tags: #Divya Jalga News#Divya Jalgaon Marathi news#Retire R. k pawar#सेवानिवृत्तीपर सोहळाTahsildarYawal
Previous Post

जैन हिल्स येथे १ ते ५ जून दरम्यान फालीचे ८ वे संम्मेलन

Next Post

दहा दिवसात ईडीने जप्त केलेली प्राॅपर्टी खाली करण्यासंदर्भात नाेटीस; मात्र खडसेंचा दुजाेरा

Next Post
भोसरी भूखंड प्रकरणी खडसेंना दिलासा, सोमवारपर्यंत अटकेची कोणतीही कारवाई करणार नाही

दहा दिवसात ईडीने जप्त केलेली प्राॅपर्टी खाली करण्यासंदर्भात नाेटीस; मात्र खडसेंचा दुजाेरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group