जळगाव प्रतिनिधी – जबरी लुटीनंतर ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या एका सराईतासह त्याच्या साथीदारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी अटक केली. या गुन्हेगाराने २४ तासांपूर्वीच वरणगावहून ट्रॅक्टर चोरी केले होते.
आकाश संजय पाटील (रा. अधिकारी निवासस्थान, सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव) व गणेश राजेंद्र शिंदे (रा. हरिविठ्ठलनगर) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. आकाशविरुद्ध जबरी लुटीचे तीन गुन्हे यापूर्वी दाखल आहेत.
दोघांनी मंगळवारी वरणागावातून एक ट्रॅक्टर चोरले. ट्रॅक्टर घेऊन पिंप्राळा येथे आले होते. ही माहिती पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. दरम्यान, घरफोडी, सोनसाखळी हिसकावल्याच्या गुन्ह्यांच्या तपासासाठी अससेल्या सुधाकर अंभाेरे, विजय श्यामराव पाटील, राहुल पाटील, प्रितम पाटील, पंकज शिंदे यांच्या पथकाने दोघांना पिंप्राळातून अटक केली.