मेष:- आरोग्याकडे लक्ष ठेवावे. प्रवासाला आज चा दिवस योग्य राहील. खरेदी करण्याचा योग राहील. कामे करतांना सावधता बाळगावी. मुलांकडे लक्ष ठेवावे.
वृषभ:- लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. कौटुंबिक जबाबदार्या उत्तमरीत्या पार पाडाल.सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल.अति कामामुळे थकवा जाणवेल.
मिथुन:- प्रवासाला दिवस अनुकूल आहे. जमिनीची कामे सावधपणे करावीत.आरोग्याची वेळेवर काळजी घ्यावी. व्यवसायानिमित्त खर्च होईल.
कर्क:- मुलांच्या वागण्याकडे लक्ष ठेवावे. जुगारात नुकसान संभवते. सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा लागेल. कर्ज घेण्याचा विचार टाळावा. सहकार्यांशी मतभेद संभवतात.
सिंह:- सर्वांशी गोडीगुलाबीने वागाल. कौटुंबिक गोष्टी धीराने हाताळाव्यात. जवळच्या प्रवासात सतर्क राहावे. विरोधक शांत राहतील. गुंतवणुकीबाबत विचार करावा.
कन्या:- प्रवासात वाहन जपून चालवावे. मुलांच्या शिक्षणाची चिंता लागेल. आर्थिक कमाई वाढणार. भावंडांकडून त्रास होऊ शकतो. तुमच्याविषयी गैरसमज होऊ शकतात.
तूळ:- कामातील बदल लक्षात घ्यावेत. सगळ्याच कामात दिरंगाई जाणवेल. क्षुल्लक गोष्टीवरून चिडचिड होऊ शकते. विरोधकांकडे लक्ष ठेवावे लागेल.
वृश्चिक:- जीवावर उदार होऊ नका. घरातील वातावरण तप्त राहील. जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. अतिसाहस करायला जाऊ नका.
धनू:- मानसिक चिंता सतावतील. मनातील चुकीचे विचार काढून टाकावेत. सकस अन्न ग्रहण करावे. मोठे व्यावसायिक बदल करण्याचा विचार कराल. महत्त्वाकांक्षा बाळगावी लागेल.
मकर:- मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींनी सजग राहावे. फक्त स्वत:च्या लाभाचा विचार करू नका. प्रवासात खबरदारी घ्यावी.
कुंभ:- बँकेची कामे सुरळीत पार पडतील. आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी. कामाच्या ठिकाणी सावधपणे वागावे. सहकारी तुमच्यावर नाराज होऊ शकतात. वडीलधार्यांचा मान राखावा.
मीन:- तुमच्या कार्याची दखल घेऊन तुमचे कौतुक करण्यात येईल. सर्वांसमोर तुमचं मान वाढेल. आरोग्याकडे लक्ष ठेवावे.