जळगाव प्रतिनिधी – जळगावच्या नागरिकांसाठी काही वर्षांपासून वेळेत पाणीपुरवठा होत होता मात्र काही दिवसापासून वेळेत पाणीपुरवठा होत नसल्याने नोकरदार महिलांचे जास्त हाल होत असल्याचे अनेक महिलांनी प्रतिक्रिया दिली. तसेच कामावर वेळेत जावे लागत असल्याने असे कधी ही पाणीपुरवठा केल्याने आमचे तर हाल होत आहे याकडे शहरातील महापौर यांनी याकडे लक्ष घावे अशी ही मागणी करण्यात आली.
उन्हाळा सुरु झाला त्यादिवसांपासून पिवळं पाणी, घाण पाणी असे पाण्याबाबत अनेक तक्रारी सुरु झाल्या आहे. मात्र काही दिवसापासून तर सकाळी ५ वाजता येणारा पाणी दुपारपर्यंत ही येत नसल्याने कामावर जाणारी महिलांचे जास्त हाल होत असल्याचे अनेक महिलांनी याबाबत दिव्य जळगावशी संपर्क करून आपली प्रतिक्रिया दिली. तसेच याकडे महापौर यांनी ही लक्ष देऊन पाणीपुरवठा वेळेत करण्यात यावे अशी मागणी केली.