जळगाव प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य अग्रवाल समाजाचे २५ वे रौप्य महोत्सवी अधिवेशन धुळे येथील स्टेशन रोडवरील हिरे भवन येथे ४ व ५ जून रोजी आयाेजित करण्यात आले आहे.
संमेलनातील पहिल्या सत्रात युवकांच्या बेरोजगारीवर, दुसऱ्या सत्रात अध्यात्मावर चर्चा हाेणार आहे. तिसऱ्या सत्रात खान्देशातील आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना दत्तक घेऊन त्यांना यथाशक्ती मदती दिली जाणार आहे. चौथ्या सत्रात पर्यावरणावर चर्चा हाेणार आहे . चर्चासत्रात प्रसिद्ध वक्ते मनीष गुप्ता, नागपूरचे माजी महापौर दयाशंकर तिवारी मार्गदर्शन करणार आहेत. यासह रेकी विशेष तज्ज्ञ राजेश्वर मोदी, रत्नाकर महाजन हे मार्गदर्शन करतील.
दुसऱ्या दिवशी प्रांतीय अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रसंत रमेश ओझा यांच्या हस्ते होईल. साध्वी ऋतुंबरा, भागवत भास्कर, संजीव ठाकूर, साध्वी चित्रलेखा देवी यासह इंद्रेश उपाध्याय उपस्थित राहतील. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे प्रांतीय अध्यक्ष विजय चौधरी असतील. अग्र भूषण व अग्रश्री पुरस्काराने ओमप्रकाश अग्रवाल, सुभाषचंद्र देविदान, उत्तमचंद गोयंका, बसंत अग्रवाल, अनिल अग्रवाल, श्याम ढेढिया, अशोक अग्रवाल, विनोद मित्तल यांचा सन्मान करण्यात येणार आहे , असे जिल्हा अग्रवाल संघटनेचे अध्यक्ष पवन मित्तल, डॉ. सुरेश अग्रवाल, अमित अग्रवाल यांनी कळवले.