जळगाव – जिल्हा कोरोनामुक्त झाला असतानाच मंगळवारी पुन्हा तीन रुग्ण बाधित आढळून आले आहे. एकाच दिवशी तीन कोरोना बाधित आढळून आल्याने चिंता निर्माण झाली आहे.
यात एक रुग्ण चोपडा तालुक्यातील तर दाेन रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. बदलत्या वातावरणाचा शरीरावर परिणाम होत असून सर्दी, खोकला, ताप आल्यास रुग्णांनी तपासणी करून घेणे आवश्यक आहे.