जळगाव प्रतिनिधी – शिवभाेजन याेजनेच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी जिल्हा पुरवठा शाखेने सुरू केलेल्या व्हाॅट्सअॅप ग्रुपचा दुरुपयाेग केल्याने हा ग्रुप बंद करण्यात आला आहे.
शिवभाेजन या उपक्रमाची परिणामकारकता वाढवण्यासाठी जिल्हा पुरवठा शाखेतर्फे सर्व केंद्र चालक व पुरवठा शाखेचे प्रमुख व अधिकारी वर्ग यांचा समावेश असलेला व्हाॅट्सअॅप ग्रुप तयार केला हाेता. यावर केंद्रांनी दैनंदिन वाटप केलेल्या शिवभाेजन थाळ्यांची माहिती दिली जायची. तसेच पुरवठा विभागाला काही सूचना करायच्या असल्यास त्या याच ग्रुपवरून दिल्या जायच्या मात्र साेमवारी या ग्रुपवर एका केंद्र चालकाने सट्ट्याचे आकडेच टाकल्याने हा ग्रुप पुरवठा शाखेने तात्काळ बंद केला आहे.