Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्ताने हिंदू एकता दिंडी

by Divya Jalgaon Team
May 20, 2022
in जळगाव, सामाजिक
0
डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्ताने हिंदू एकता दिंडी

जळगाव – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्ताने सनातन संस्थेतर्फे गुरुवारी सायंकाळी शहरातून हिंदू एकता दिंडी काढण्यात आली. यावेळी श्रीरामचंद्र की जय, जय भवानी जय शिवाजी यांसह घोषणांनी परिसर दणाणला होता.

सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या हस्ते सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या पालखीचे पूजन करण्यात आले. श्री श्री १००८ सरजू दास महाराज यांच्या हस्ते धर्मध्वज पूजन करत नेहरू चौक येथून दिंडीला सुरवात झाली. पौरोहित्य नंदू शुक्ल यांनी केले. टॉवर चौक, चित्रा चौक या मार्गे शिवतीर्थ मैदान येथील चौकात समारोप झाला. शेवटी उपस्थितांना सनातनचे सद्गुरू नंदकुमार जाधव, वरसाडेकर महाराज यांनी संबोधित केले.

शाेभायात्रेच्या मार्गात नेहरू चौकात सुनील कोल्हे, सपनकुमार झुणझुणवाला, टॉवर चौकात नीलेश पवार, चित्रा चौकात नीलेश संघवी व समस्त तांबट परिवार, इच्छापूर्ती गणपती मंदिराजवळ नरेश वाणी, कोर्ट चौक येथे चैतन्य बापू संप्रदाय परिवारातर्फे पुष्पवृष्टी करण्यात आली.

Share post
Tags: #डॉ. जयंत आठवले#श्री श्री १००८ सरजू दास महाराज#हिंदू एकता दिंडीHindu Ekta Dindi
Previous Post

धान्याचा लाभ घेणाऱ्यांना ३० जुन पर्यंत आधार नोंदणी आवश्यक

Next Post

खंडेरावनगरात २० पक्के अतिक्रमणे जमीनदाेस्त

Next Post
खंडेरावनगरात २० पक्के अतिक्रमणे जमीनदाेस्त

खंडेरावनगरात २० पक्के अतिक्रमणे जमीनदाेस्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group