Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

राजर्षी  शाहू महाराज स्मृतीदिनी व्याख्याने द्वारे रगंला लोक जागर

by Divya Jalgaon Team
May 6, 2022
in जळगाव, सामाजिक
0
राजर्षी  शाहू महाराज स्मृतीदिनी व्याख्याने द्वारे रगंला लोक जागर

जळगाव – आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमाच्या अंतर्गत व राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय व राष्ट्रीय सेवा योजना विभाग शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगाव यांच्या संयुक्त सहकार्याने राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी दिनी विशेष व्याख्यान व शाहीरी पोवाड्या द्वारे शाहू महाराजांच्या जीवन कार्याचा जागर करणा-या लोकजागर कार्यक्रमाचे आयोजन शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था जळगाव या ठिकाणी करण्यात आले होते

या कार्यक्रमाचा शुभारंभ सामाजिक न्याय विभाग जळगाव चे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य ए आर चौधरी सर उपस्थित होते या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी विजय रायसिगं, नेहरु युवा केन्द्र चे जिल्हा युवा अधिकारी नरेन्द्र डागर प्रशिक्षण संस्थेचे कार्यालयीन अधिक्षक बाळासाहेब कुमावत गट निदेशक ए आर बोरोले सर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिप प्रज्वलित करून करण्यात आली

राजर्षी  शाहू महाराज स्मृती शताब्दी दिनाच्या निमित्ताने मणियार लाँ कालेज येथील सहाय्यक प्राध्यापक व राज्य शास्त्रा चे आभ्यासक प्रमुख वक्ते प्रा. गणपत धुमाळे सर यांचे विशेष व्याख्यानाने कार्यक्रमास प्रारंभ झाला या व्याख्यानात समता मूलक समाज निर्मितीत राजर्षी शाहू महाराज यांचे योगदान या विषयावर त्यांनी आपले प्रभावी विचार मांडले कार्यक्रमाच्या दुस-या सत्रात , शाहीर शिवाजी पाटील व सहकारी यांनी राजर्षी  शाहू महाराज  यांच्या जिवन कार्यावर, विविध सामाजिक विचारावर शाहीरी पोवाड्या द्वारे लोकजागर हा कार्यक्रम सादर केला तर जळगाव चे प्रसिद्ध पथनाटय कार लोककलावंत शाहीर विनोद ढगे आणि सहकारी यांनी शाहू महाराज यांचा सामाजिक न्यायाचा नाट्य व गिता द्वारे संदेश देण्यारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.

राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ना अमित देशमुख यांच्या संकल्पनेतून राज्याच्या सहा प्रशासकिय विभागात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते… नाशिक विभागिय क्षेत्रातील कार्यक्रम हा जळगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला होता. सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव विजय सौरभ व संचालक बिभीषण चवरे यांच्या मार्गदर्शना ने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे स्वागत राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी दिपक कोळी सर व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी एस एस उगले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन महाजन यांनी केले तर आभार कार्यक्रम समन्वयक विनोद ढगे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी दुर्गश आंबेकर, अरविंद पाटील, अवधुत दलाल, मोहीत पाटील, व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वंयसेवकाने परिश्रम घेतले

Share post
Tags: #Assistant Commissioner Yogesh Patil#Department of National Service Planning#Government Industrial Training Institute#Social Justice Department Jalgaon#राजर्षी शाहु महाराज
Previous Post

मौलाना आझाद फाऊंडेशनला राज्य शासनाचा जिल्हा युवा पुरस्कार प्रदान

Next Post

यावल येथे एका तरुणावर प्राणघात हल्ला

Next Post
यावल येथे एका तरुणावर प्राणघात हल्ला

यावल येथे एका तरुणावर प्राणघात हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group