यावल प्रतिनिधी – यावल येथील पटेल वाडा भागातील रहिवासी जावेद युनूस पटेल (वय २३ ) शहरातील काझीपूरा भागतील एका महिले सोबत त्यांचे प्रेमसंबंध होते या संबंधातून त्यांचे वाद झाले.
सदर महिलेने मध्यरात्री दोन वाजेच्चा सुमारास जावेद पटेल यांना कॉल करून घराबाहेर बोलावले तेव्हाच घराबाहेरील फैजपूर चे गुड्डू डॉन आणि सोनू नामक या तिघांनी त्याला दुचाकीवर बसवून भूसावळ रस्त्यावरती असलेले घोडेपिर दर्गावर घेवून गेले तेथे त्याचा वाद झाला आणि तिघांनी त्याला धारदार चाकूने जिवे ठार मारण्याचा पर्यत केला.
तरी महामार्गावर रहधारिचा वाहनांना पाहून तिघांनी पळ काढला . तर जख्मी अवस्थेत असेला तरुण जावेद पटेल यांने नातेवाईकांना माहिती व त्याला तातडीने यावल ग्रामिण रुग्णालयात दाखल केले तेव्हाच प्रथोपचार करून तातडीने जळगाव जिल्ह्याचे शासकिय वैद्यकिय महाविद्यालय उपचार करीता दाखल करण्यात आले.
या हल्ल्याच्या कळतात शहरात एकच खळबळ उडाली आहे. असून गंभीर पणे जख्मी जावेद पटेल याचा जाब जवाब घेण्यासाठी यावल पोलीस स्थानकाचे परिविक्षाधीन आय.पी.एस अधिकारी आशित कांबळे व पोलीस उपनिरिक्षक सुनिता कोपळकर हे जळगाव रवाना झाले आहे.