जळगांव – राज्य शासनाचा क्रीडा व युवक संचालनालय, पुणे अंतर्गत जळगांव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जळगांव शहरातील उपक्रमशील संस्था मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनला सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हा स्तरीय जळगांव जिल्हा युवा पुरस्कार देऊन पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांचा हस्ते सन्मानित करण्यात आले.
पोलीस कवायत मैदानावर १ मे महाराष्ट्र दिनानिमित्तच्या ध्वजारोहण प्रसंगी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा हस्ते गौरव करण्यात आला.यात मौलाना आझाद अल्पसंख्यांक फाऊंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात पुढाकार घेऊन समाजाच्या उन्नतीसाठी योगदान देत आहे.तसेच विविध क्षेत्रात भरीव कार्य केले आहे.या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेऊन राज्य शासनाने २०१९-२० जळगांव जिल्हा युवा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
या वेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत, पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, महापौर जयश्री महाजन,जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, प्रकल्प अधिकारी विजयसिंह परदेशी,आदींची उपस्थितीत मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष फिरोज शेख,रोशनी शेख, मोनाली कुमावत,सुवर्णलता अडकमोल, सपना श्रीवास्तव,निवेदिता ताठे, मोहसीन काझी आदींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.या बद्दल सर्वत्र संस्थेच्या कार्याचे कौतुक होत आहे.