जळगाव प्रतिनिधी – गेल्या वर्षी इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीनंतर त्याने तिला प्रपोज केले. पहिल्या नकारानंतर तिने होकार दिला. त्यानंतर त्याने लग्नाचे आमिष व धमकी देऊन नागपूर येथील लॉजवर तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर कारमध्ये बसवून एकटीलाच सोडून दिले. तेथून आल्यानंतर नूतन मराठा महाविद्यालयाजवळ रडत असलेल्या त्या युवतीला सामाजिक कार्यकर्त्यांनी विचारपूस केल्यानंतर याप्रकरणी सोमवारी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर जिल्ह्यातील ‘त्या’ युवतीची जळगावातील गेंदालाल मिलमध्ये राहणाऱ्या दानिश मुलतानी या युवकाशी ओळख झाली. पुढे दोघांनीही परस्परांना एकमेकांचे मोबाइल क्रमांक दिले. त्यानंतर त्याने तिच्यावरील आंतरधर्मीय प्रेम व्यक्त केले. सुरुवातीला तिने नकार दिला. त्यानंतरही त्याने खूप प्रेम असल्याचे सांगत प्रयत्न सुरू ठेवले. अखेर तिने होकार दिला. डिसेंबर २०२१ मध्ये तिचा विवाह ठरलेला होता. त्याबाबत तिने दानिशला सांगितले. त्यानंतरही तो तिला भेटायला नागपूर येथे गेला.
फेब्रुवारीत तो तिला नागपूर येथील लॉजवर घेऊन गेला. तेथे तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. जळगाव येथील मित्राच्या घरीही त्याने तिच्या मनाविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले. २१एप्रिल २०२२ रोजी त्या युवतीचे लग्न ठरलेले होते. त्याबाबत त्याला सांगूनही तो लग्न मोडण्याच्या व बदनामी करण्याच्या धमक्या देत होता. त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी त्याचा मित्र बाबू उर्फ उमर व मामाची मुलगी आशू हिने सांगितले. त्यानंतर १ एप्रिल राेजी ती युवती नागपूर येथे निघून गेली. तेथे दानिश मित्रासह कार घेऊन आला.
त्यानंतर दोघांनी बाबाताज दर्गा येथे पूजा केली. तेथून रात्री ११.३० वाजता त्याच्या मलकापूर येथे राहणाऱ्या सावत्र आईकडे गेले. तेथे दोन दिवस राहण्यास सांगून तो निघून गेला. त्यानंतर ती युवती १० एप्रिल रोजी जळगाव येथे आली. त्याने फोन बंद करून ठेवलेला होता. ११ एप्रिल रोजी ती युवती नूतन मराठा महाविद्यालयाजवळ रडत होती. सामाजिक कार्यकर्त्यांनी तिची विचारपूस केल्यानंतर हा प्रकार समोर आला.