Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

‘पॉवर अवार्ड २०२२’ मध्ये महावितरण तब्बल सात पुरस्कारांचे मानकरी

by Divya Jalgaon Team
April 11, 2022
in जळगाव, सामाजिक
0
‘पॉवर अवार्ड २०२२’ मध्ये महावितरण तब्बल सात पुरस्कारांचे मानकरी

जळगाव – वीज वितरण क्षेत्रातील विविध उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत इन्डीपेन्डंट पॉवर प्रोड्यूसर असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने (आयपीपीएआय) देशपातळीवरील तब्बल सात पुरस्कारांनी महावितरणला गौरविण्यात आले आहे. बेळगाव (कर्नाटक) येथे शनिवारी (ता. ९) आयोजित ‘पॉवर अवार्ड २०२२’ कार्यक्रमामध्ये केंद्रीय ऊर्जा विभागाचे सहसचिव श्री. घनश्याम प्रसाद यांच्याहस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

इन्डीपेन्डंट पॉवर प्रोड्यूसर असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने देशातील विविध वीज वितरण कंपन्यांनी ग्राहकाभिमुख सेवा, नाविन्यता, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आदी वर्गवारीमध्ये केलेल्या कामगिरीचे मूल्यांकन करून ‘पॉवर अवार्ड २०२२’ जाहीर करण्यात आले आहे. त्यातील सर्वाधिक ७ पुरस्कारांवर महावितरणने विजेतेपदाची मोहोर उमटविली आहे. यामध्ये १) नुतनीकरणक्षम ऊर्जेला प्रोत्साहन देणारे सर्वोत्तम राज्य वर्गवारीमध्ये प्रथम पुरस्कार, २) इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन आणि ३) सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वीज वितरण कंपनीमध्ये उत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार, ४) आरएफ मीटरींग व मीटर डेटा आणि ५) ग्राहक सेवेतील नाविन्य व माहिती तंत्रज्ञान सेवा वर्गवारीमध्ये सर्वोत्कृष्ट नवकल्पना पुरस्कार तसेच ६) ग्राहक जागरूकता वाढविण्यासाठी उत्कृष्ट वितरण कंपनी आणि ७) गेल्या दशकात ग्रामीण भागात सर्वात जलद विद्युतीकरण साध्य करणारी कंपनी म्हणून महावितरणला देश पातळीवर दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांच्या नेतृत्त्वात महावितरणने ही कामगिरी बजावली आहे. महावितरणचे कार्यकारी संचालक श्री. अरविंद भादीकर व अधीक्षक अभियंता श्री. मिलिंद दिग्रसकर यांनी बेळगाव येथे महावितरणच्या वतीने हे सर्व पुरस्कार स्वीकारले. देशपातळीवरील तब्बल सात पुरस्कारांचा सन्मान मिळाल्याबद्दल महावितरणचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत, राज्य ऊर्जामंत्री ना. श्री. प्रसाद तनपुरे, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव श्री. दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी अभिनंदन केले आहे

Share post
Tags: #‘पॉवर अवार्ड २०२२’#इन्डीपेन्डंट पॉवर प्रोड्यूसर असोसिएशन ऑफ इंडिया#ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत#घनश्याम प्रसाद#पुरस्कारांचे मानकरी
Previous Post

पाचव्या फेरीअखेर महिला गटात एअरपोर्ट ऑथोरिटी एकमेव संघ आघाडीवर

Next Post

गेंदालाल मिलमध्ये राहणाऱ्या दानिश मुलतानी विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post
धक्कादायक! गर्भवती महिलेवर पाच जणांनी केले बलात्कार

गेंदालाल मिलमध्ये राहणाऱ्या दानिश मुलतानी विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group