यावल प्रतिनिधी (रविंद्रआढाळे) – तालुक्यातील डोंगर कठोरा येथे आय पी एस आशीत कांबळे यांनी शांतता सभा घेऊन डाँ भिमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात येणार आहे ती शांततेत काढावी व गावात ग्रामसुरशा रशंक नेमले आहे त्यांना व्यवस्थीत समजावून सांगितले की कसे कार्य करावे तसेच शेतकर्यांच्या समस्या होत्या त्यावर पण व्यवस्थित मार्गदर्शन केले.
गावातील चोरी थांबवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सरपंच याच्याशी चर्चा करून गावात जास्तीत जास्त सी सी टिव्ही कॅमेरे बसविली तर गावातील चोरी प्रकरण असतील ते कमी होतील असे गावातील नागरिकांना मार्गदर्शन केले व आय पी एस आशीत कांबळे यांचे स्वागत सरपंच नवाज तडवी यांनी केले. पो.नि.क अजमल पठाण यांचे स्वागत उपसरपंच धनराज पाटील यांनी केले.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर सरपंच नवाज तडवी उपसरपंच धनराज पाटील सदस्य राजेंद्र झाबरे दिलीप तायडे पोलिस पाटील राजरत्न आढाळे प्रदीप पाटील सायबु तडवी खेमा पाटील कलेश कोल्हे गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते