यावल प्रतिनिधी – देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केन्द्रातील सरकारच्या कार्यकाळात भरमसाठ वाढलेल्या महागाईच्या विरोधात भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या वतीने यावल येथे महागाईमुक्त भारत आंदोलन व मोदी सरकारचा जाहीर निषेध पुकारण्यात आले.
केन्द्रात पंतप्रधान नरेन्द मोदी यांच्या नेतृत्वाखाली केन्द्र शासनाच्या गोंधळलेल्या व सर्व सामान्यांचे इंधन दरवाढीच्या नांवाखाली सर्वसामान्य जनतेची लुटमार करून कंबरडे मोडणाऱ्या महागाई देशातील सर्वसामान्य व्यक्ती हा बेहाल झाला आहे. या बेजबाबदार व अर्थहीन शासन कारभाराने संपूर्ण देशाला वेठीस धरले असुन , जिवनावश्यक वस्तु पासुन तर पेट्रॉल , डीझेल , गृहणीचे स्वंयपाक गॅस या प्रत्येक वस्तुंच्या किमती गगनाला भिडल्या असुन, या महागाईच्या विरोधात रावेर यावल विधान सभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी व काँग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वखाली , काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान, जिल्हा नियोजन समिती सदस्य शेखर पाटील , खरेदी विक्री संघाचे चेअरमन अमोल भिरुड, माजी नगरसेवक अस्लम शेख नबी , माजी नगरसेवक समीर शेख मोमीन , माजी नगरसेवक गुलाम रसुल, माजी नगरसेवक मनोहर सोनवणे ,बामणोद चे सरपंच राहुल तायडे , कोरपावली सरपंच विलास अडकमोल, दहिगाव सरपंच अजय अडकमोल, वढोदे सरपंच संदीप सोनवणे , काँग्रेस कमेटीचे तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह , पंचायत समितीचे मावळते सदस्य सरफराज तडवी, पुंडलीक बारी , संगोयोचे माजी अध्यक्ष खलील शाह यांच्यासह आदी पदाधिकारी व पक्षाचे कार्यकर्ते मोठया संख्येत उपस्तित होते. या आंदोलनास यशस्वी करण्यासाठी कॉंग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष कदीर खान , उपाध्यक्ष अनिल जंजाळे यांच्यासह पक्षाच्या सर्व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.