चोपडा – शहर व तालुका काँग्रेसतर्फे वाढत्या महागाईच्या विरोधात केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी महागाई मुक्त भारत आंदोलन करण्यात आले. चोपडा तहसील कार्यालयासमोर एक एप्रिल 2022 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा काँग्रेसचे नेते एडवोकेट संदीप सुरेश पाटील यांचे नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले.
यावेळी गॅस हंडी, मोटर सायकल, तेलाचे कॅन अशा खाली वस्तू ठेवून निदर्शन करण्यात आले. यावेळी टाळ-मृदंगाच्या गजरात केंद्र सरकारचा निषेध करणारे अभंग म्हणण्यात आले. केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. इंधनाची दरवाढ कमी करा, गॅस हंडी चे दर कमी करा. जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करा. अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. शहर काँग्रेस अध्यक्ष के. डी. चौधरी, तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील ,अजबराव पाटील, मधुकर आबा पाटील, देवानंद शिंदे, योगिता चौधरी, शशिकांत चौधरी, रमेश शिंदे ,चेतन बाविस्कर, नंदकिशोर सांगोरे, राजेंद्र भास्करराव पाटील, किरण सोनवणे, सोहन सोनवणे, एडवोकेट एस .डी .पाटील, सुनील न्हायदे, संजय बोरसे ,फातिमा जागीरदार, इलियास पटेल, देवकांत चौधरी, गोपीचंद चौधरी, गुलाब चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मागण्यांचे निवेदन मा. तहसीलदार यांच्या वतीने श्री सय्यद त्यांनी स्वीकारले.