जळगांव – महाराष्ट्र् राज्य वरिष्ठ आंतरजिल्हा बॅडमिंटन स्पर्धेसाठी ठाणे येथे दिनांक ३ ते ५ एप्रिल दरम्यान जळगांव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचा पुरुष व महिला संघ रवाना झाले असून त्यात पुरुष संघचा कर्णधार शुभम पाटील तर महिला संघाची कर्णधार साची गांधी असणार आहेत.
निवड झालेल्या संघास जैन इरिगेशनने प्रायोजकत्व दिले असून निवड झालेला संघ –
शुभम पाटील, प्रणव पाटिल, गोपाल पाटील, दीपेश पाटील, कृष्णा अग्रवाल, उमेर देशपांडे, अथर्व शिंदे, ओजस सोनवणे, देवेश पाटील
महिला संघ
साचि गांधी, राजश्री पाटिल, सुगीता चौधरी, इशिका शर्मा, सौम्या लोखंडे.
संघासोबत प्रशिक्षक म्हणून किशोर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली.
संघास निरोप देण्यासाठी जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे सचिव विनीत जोशी ,सभासद चंद्रशेखर जाखेटे खजिनदार अरविंद देशपांडे,जैन इरिगेशनचे अनिल जोशी उपस्थित होते.
निवड झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन उपाध्यक्ष तेजेंद्रसिंग महिंद्रा यांनी शुभेच्छा दिल्या.