यावल ( प्रतिनिधी ) – यावल तालुक्यातील फैजपूर ( न्हावी )येथील मधुकर सहकारी साखर कारखान्यासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवार पासुन आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते तर या उपोषणाला कारखाना कामगारांनी देखील आपला पांठीबा दिला होता दरम्यान शेतकरी व कामगारांचा विचार करून साखर कारखान्या संर्दभात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मसाका संचालक मंडळाने दिल्याने बुधवारी सदरील उपोषण मागे घेण्यात आले आहे.
मधुकर सहकारी साखर कारखाना न्हावी तालुका यावल भाडेतत्त्वावर देऊन सुरू करण्यात याव्यात व त्यासाठीची निविदा प्रक्रिया तातडीने राबविण्यात यावी सह विविध मागण्यांसाठी मनसेने कडून जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांच्याकडे निवेदन दिले होते मात्र, वेळेत मागण्या मान्य न झाल्यामुळे सोमवारपासून मनसेच्या वतीने मधुकर सहकारी साखर कारखाना येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. मात्र बुधवारी मसाका चेअरमन शरद महाजन सह संचालकांनी उपोषकर्त्यांची भेट घेवुन कारखाना सुरू झाला पाहिजे तसेच थकीत कर्ज संर्दभात जिल्हा बँकेकडून मिळालेली नोटीस आणी त्या दृष्टीने संचालक मंडळाकडून घेण्यात आलेल्या बैठकीतील निर्णय या बाबत चर्चा करण्यात आली व भविष्यात कारखाना सुरू झाला पाहिजे म्हणुन सर्व संचालक मंडळ प्रयत्नशिल असुन शेतकऱ्यांची देणी चुकती केली जाईल व कामगारांना काम मिळेल असे अश्वासन मसाकाचे चेअरमन शरद जिवराम महाजन यांनी दिले.
या आश्वासना नंतर मनसेचे जनहित जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर, किशोर नन्नवरे, अजय तायडे, गौरव कोळी, अनिल सपकाळे या पदाधिकाऱ्यांच्या आमरण उपोषणाची सांगता झाली .