यावल प्रतिनिधी – यावल येथील यावल पंचायत समितीचे वरिष्ठ कनिष्ठ प्रशासन अधिकारी सोपान तायडे यांच्या सेवानिवृत्तीपर निरोपा कार्यक्रम संपन्न झाला. यावल येथे पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झाला.
या ३९ वर्षाच्या सेवापुर्ती निरोप संमारभाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड ( बोरसे ) या होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन पंचायत समितीचे मावळते उपसभापती योगेश दिलीप भंगाळे व सदस्य व गटनेते शेखर सोपान पाटील , दिपक अण्णा पाटील , यावल नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील , पंचायत समितीचे मावळते सदस्य सरफराज तडवी , ग्रामविस्तार अधिकारी किशोर सपकाळे , तालुका आरोग्य अधिकारी हेमन्त बऱ्हाटे ,गटशिक्षण अधिकारी नईम शेख ,कक्ष अधिकारी सरवर तडवी ,सेवानिवृत्त कक्ष अधिकारी नाना बोदडे यांच्यासह कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी संमारंभास आर्वजून उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पंचायत समितीचे कृषी अधिकारी डी पी कोते यांनी केले . यावेळी उपस्थित शेखर पाटील ,अतुल पाटील, नाना बोदडे, गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांच्यासह आदी मान्यवरांनी सेवानिवृत्त झालेले सोपान तायडे यांच्या प्रशासकीय सेवे संदर्भात मनोगत व्यक्त करतांना एक शिस्तप्रिय ,आपल्या कर्तव्याची जाणीव असणारे मृदभाषीक व सर्वांशी आपुलकीने वागणारे असे अधिकारी म्हणुन त्यांचा गुणगौरव करण्यात आला, या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तायडे यांचा सहपत्नीक सेवापुर्तीपर प्रसंगी सत्कार करून निरोप देण्यात आले.