यावल प्रतिनिधी – गौण खनिजांच्या चोरी प्रकरणी संविधान रक्षक दल भीम आर्मीचे राज्यसचिव सुपडू संदानशिव आंदोलनाच्या करण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी सांगितले तसेच संरद भीम आर्मी प्रमुख प्रफुल्ल शेंडे आणि प्रदेशाध्यक्ष रमाकांत तायडे यांच्याशी विचारविनिमय करून ठरविणार पुढील पवित्रा घेतले जाईल असे ही यावेळी सांगितले.
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात असणाऱ्या चुंचाळे ह्या छोट्याशा गावातील गायरान जमिनिवरीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत चिंताजनक बनलेली बाब म्हणजे गौण खनिजांची चोरी. ह्या खनिज चोरांविरोधात संविधान रक्षक दल भीम आर्मी महाराष्ट्र राज्यसचिव सुपडू संदानशिव यांनी जोरदार मोहीम उघडली असून त्याचाच एक भाग म्हणून चुंचाळे येथील चोरीस गेलेल्या लाखो रुपयांच्या गौण खनिजाची चौकशी व संबधित व्यक्ती वर योग्य ती कार्यवाही करणे बाबत सुपडू संदानशिव यांनी यावल तालुका तहसीलदार यांना एक लेखी निवेदन दिले आहे.
सदरहू पत्रकात सुपडू संदानशिव यांनी स्पष्टपणे आरोप करून मागणी केली आहे की , मागील चार ते पाच महिन्यात यावल तालुक्यातील (चुंचाळे गावाजवळील) गायरान येथून चोरीस गेलेले लाखो रुपयांचे गौण खनिज कोणाच्या अनुमती द्वारे काढण्यात आले व त्या ठिकाणाहून कोणकोणत्या व्यक्तिंद्वारे गौण खनिज वाहतूक केलेली आहे ? याची संपूर्ण चौकशी करून सदरील प्रकरणातील व्यक्तीवर्ती कठोर शासन करण्यात यावे.
यावेळी निवेदन देताना संविधान रक्षक दल भीम आर्मी महाराष्ट्र अध्यक्ष रमाकांत तायडे,राज्य सचिव सुपडू संदानशिव जळगांव जिल्हा अध्यक्ष श्रीकांत वानखेडे, विक्रम प्रधान, डॉली वानखेडे, विकास वलकर, यावल तालुका अध्यक्ष सचिन वानखेडे, गौरव सोनवणे, विनोद भालेराव, शिवाजी गजरे, विनोद सोनवणे ,राजू वानखेडे, सतीश अडकमोल, करण ठाकरे, नितीन घोडके, रोशन तडवी, प्रवीण सावळे, रतन सोनवणे यांच्यासह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.