जळगाव – रोहिनी करण उईके / बारेला ही बालिका २३ ऑगस्ट, २०१६ पासून या बालिकेला मा. अध्यक्ष सदस्य बाल कल्याण समिती ठाणे यांचेकडील बदली आदेशा नुसार व अध्यक्ष / सदस्य बाल कल्याण समिती जळगाव यांचेकडील दाखल आदेशानुसार जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटना संचलित मुलींचे बालगृह / निरीक्षण जळगाव येथे दाखल करण्यात आलेले आहे. बालिकेचे आज रोजी वय १५ वर्षे आहे बालिका दाखल झाल्यापासून ते आजतागायत बालिकेचे कोणी आई – वडिल व नातेवाईक हे बालिकेच्या भेटीस आलेले नाही व त्याविषयी कुठलाही पुरावा उपलब्ध नाही.
सदर मुलगी रोहिनी करण उईके / बारेला या बालिकेला पालक, नातेवाईक, ओळखत असलेले व्यक्तीना माहिती होणेसाठी व पुढील पुर्नवसनाची प्रक्रिया सुलभ होणेसाठी बातमी प्रसिध्द झाल्याच्या ३० दिवसाच्या आत लवकरात लवकर संपर्क साधावा, बाल कल्याण समिती जळगाव ०२५७- २२३९८५१ व जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटना संचलित मुलींचे बालगृह / निरीक्षण जळगाव ०२५७- २२२४२०७ तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष जळगाव फोन न. ०२५७- २२२८८२५ येथे संपर्क साधावा व सदर बालकाचे कोणी पालक, नातेवाईक यांनी संपर्क न केल्यास अध्यक्ष / सदस्य बाल कल्याण समिती जळगाव यांच्या आदेशाने बालिकेच्या पढील पुर्नवसनाची प्रक्रिया करण्यात येईल, असे वनिता सोनगत, सदस्य सचिव, जिल्हा बाल संरक्षण कक्ष तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.