जळगाव – 31 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय तृतीय पंथी ओळख दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. या निमित्ताने मा. मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई यांचे कार्यालयामार्फत दिनांक 27 मार्च ते 2 एप्रिल, 2022 हा तृतीय पंथीयांच्या मतदार नोंदणीचा विशेष सप्ताह म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
तृतीय पंथीय नागरिकांनी दिनांक 27 मार्च ते 2 एप्रिल, 2022 या सप्ताहामध्ये एका दिवशी तृतीय पंथीय मतदार नाव नोंदणीसाठी जळगाव जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघात आयोजित केलेल्या विशेष शिबीराचे लाभ घेऊन जास्तीत जास्त मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.