Wednesday, February 18, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

यावल तालुक्यात शेतकऱ्यांच्या होणाऱ्या पिकांच्या नुकसानी डॉ. कुंदन फेगडेंनी व्यक्त केला संतप्त

by Divya Jalgaon Team
March 16, 2022
in सामाजिक
0
यावल तालुक्यात शेतकऱ्यांच्या होणाऱ्या पिकांच्या नुकसानी डॉ. कुंदन फेगडेंनी व्यक्त केला संतप्त

यावल – रावेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पिकांचे नुकसान करणे, साहित्याची चोरी यावर आळा घालण्यासंदर्भात मंगळवारी १५ मार्च रोजी यावल कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी व पोलीस प्रशासनाच्या वतीने संयुक्त बैठक घेण्यात आली.

या वेळी शेतकऱ्यांच्या शेती नुकसानी बद्दल शेतकऱ्यांनी व डॉ. कुंदन फेगडे यांनी संताप व्यक्त केला. रावेर – यावल तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकांची नासाडी करणे, उभे पिक कापून नेणे, पीक कापून अथवा आग लावून जाळून टाकणे, शेतात गुरे चारणे, विद्युत पंप, विद्युत केबल्स चोरी या त्रासामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.

दोन दिवसापूर्वी येथील किशोर राणे यांचे शेतात बकऱ्या चराईस मनाई केल्यावरून राणे यांना बेदम मारहाण करत दुसरे दिवशी सुमारे ६ लाखाचे २ हजार केळीचे घड कापून नुकसान केले. तसेच तालुक्यातील चितोडा येथील दिनेश कुरकुरे यांच्या शेतातील हरभऱ्याच्या पेटवून देवून ५० हजार रुपयांचे नुकसान केले. या घटनेमुळे यावल तालुक्यातील शेतकरी संतापत झालेले आहे शेतकऱ्याच्या उभ्या पिकासह शेतीतील शेती साहित्याच्या चोऱ्या तसेच रात्रभर मोकाट गुरे शेतात चराईस सोडले जात असल्याने चहु बाजूने शेतक-यांची कोंडी करत नुकसान केले जात असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया बैठकीत शेतकऱ्यांनी व डॉ.कुंदन फेगडे यांनी व्यक्त करण्यात आल्या.

या दरम्यान, मोकाट गुरे मालक तसेच शेत पिकाचे नुकसान करणारे व शेत साहित्याची चोरी करणारे आढळून आल्यास त्यांचेवर कडक स्वरुपाची कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी विनंती डॉ.साहेबांनी पोलीस प्रशासनास केली. याप्रसंगी उपविभागीय पोलिस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील, डॉ. कुंदन फेगडे, शहर अध्यक्ष डॉ. निलेश गडे, धिरज महाजन, हेमराज फेगडे, किशोर राणे, प्रमोद नेमाडे, कृष्णाजी पाटील, डीगंबर सावकारे, अट्रावलचे राजेन्द्र महाजन यांनी व्यथा मांडल्या. बैठकीस शहरासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share post
Tags: #पिकांचे नुकसान#यावल कृषि उत्पन्न बाजार समिती#रावेर - यावल
Previous Post

मोहसीन खान यांना सावित्री बाई फुले राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

Next Post

पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलले

Next Post
एक दिवस पाणीपुरवठा उशिरा होणार

पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group