जळगाव – धरणगाव येथील जि प उच्च प्राथमिक उर्दू शाळा क्र. 1 येथील उपशिक्षक मोहसीन अजीज खान यांना नुकताच सावित्री बाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला असून शैक्षणिक व समाजिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
वंदनीय राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज 53 वा पुण्यतिथी महोत्सव निमित्ताने यावर्षी देखील राष्ट्रीय पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
श्री तुकडोजी महाराज अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ केंद्रीय प्रचार विभाग गुरुकुंज जि. अमरावती अधिकृत शाखा श्री गुरुदेव सेवा मंडळ जळगाव खान्देश ह्या संस्थेच्या वतीने त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.