जळगाव प्रतिनिधी – शिवाजी उद्यानाजवळ मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे बुधवारी शहरात पाणीपुरवठा केला जाणार नसून एक दिवस पुढे ढकलण्यात आले असून गुरुवारी पाणीपुरवठा करण्यात येईल.
विद्या फाउंडेशनजवळ वाघूर पाणी याेजनेच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागली. मंगळवारी गळतीचे प्रमाण वाढल्याने पाणीपुरवठा विभागाने दुरुस्तीचा निर्णय घेतला. त्यामुळे बुधवारी शहरात हाेणारा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलला, असे पाणीपुरवठा अभियंता गाेपाळ लुले म्हणाले.
गुरुवारी या भागात पुरवठा हाेणार
गुरुवारी नटराज टाॅकीज ते चाैघुले मळ्यापर्यंतचा भाग, शनिपेठ, नवीपेठ, हाैसिंग साेसायटी, शाहूनगर, प्रतापनगर, खडके चाळ, इंद्रप्रस्थनगर, केसी पार्क, गेंदालाल मिल हुडकाे, भाेईटेनगर, रिंगराेड परिसर, भिकमचंद जैननगर, जुने गाव, सिंधी काॅलनी, इंडिया गॅरेज, ओंकारनगर, जाेशीपेठ, गणेशवाडी, कासमवाडी, सम्राट काॅलनी, सुप्रीम काॅलनी, साने गुरुजी काॅलनी, पार्वतीनगर, शिवरामनगर, यशवंतनगर, श्रद्धा काॅलनी, नंदनवननगर, चर्चराेड, प्रभात काॅलनी, ब्रुकबाॅन्ड काॅलनी, वाघनगर, हरिविठ्ठलनगर, गणेश काॅलनी, श्रीकृष्ण काॅलनी, समतानगर, स्टेट बँक काॅलनी, धांडेनगर, मेहरूण, मिल्लतनगर या भागात पाणीपुरवठा हाेणार आहे.