जळगाव – महाविद्यालयीन जीवनामध्ये स्टुडंट कौन्सील (विद्यार्थी परिषद) हा एक अविभाज्य घटक म्हणुन गणला जातो. कारण कौन्सीलच्या माध्यमातुन विद्यार्थी व शिक्षक वृंद यांचे परस्पर संबध अधिक चांगल्या पद्धतीने जोपासले जातात व विद्यार्थ्यांच्या जडणघडणी मध्ये या स्टुडंट कौन्सीलचा मोलाचा वाटा असतो.
याच अनुषंगाने गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये मंगळवार, १५ मार्च रोजी विविध शाखांचे स्टुडंट कौन्सील स्थापनेच्या समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकी पाटील व डॉ.वैभव पाटील (डी.एम.कॉर्डीयालॉजीस्ट) हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. तसेच समारंभासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार, प्रा.हेमंत इंगळे (डिन अॅकेडीमिक्स), डॉ.विजयकुमार वानखेडे (ट्रेनिंग अॅड प्लेसमेंट ऑफीसर), प्रा.दिपक झांबरे (समन्वयक, पॉलीटेक्नीक) सर्व विभाग प्रमुख तसेच सर्वच शाखांचे विद्यार्थी उपस्थित होते.
स्टुडंट कौन्सील स्थापनेच्या समारंभात सुरुवातीला सर्व शाखांच्या कौन्सीलच्या विद्यार्थ्यांना त्याच्या पदानुसार बॅचेसेचे वाटप करुन त्यांना गौरविण्यात आले. त्याप्रसंगी शाखानिहाय विद्यार्थी प्रेसिडेंट यांनी त्यांच्या विभागाच्या स्टुडंट कौन्सीलची ओळख विद्यार्थ्यांना करुन दिली व आगामी काळात त्यांच्या कौन्सीलच्या माध्यमातुन करण्यात येणार्या कार्यक्रमांचा आढावा दिला. विद्यार्थी प्रतिनिधी अझर शेख (चएडअ), मुसेब शेख (उएडअ), राजेश सुरदास (एएडअ),शुभम अटावले (ढएडअ) यांनी विद्यार्थ्यांना संबोधीत केले.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजन व दिप प्रज्वलीत करुन झाली व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करतांना सांगितले की, स्टुडंट कौन्सील समारंभा नंतर आता खर्या अर्थाने तुमच्यावर नविन जबाबदारी आली आहे व प्रत्येक जबाबदारी तुम्हाला समर्थपणे पेलायची आहे कारण महाविद्यालयामध्ये नाना प्रकारचे कार्यक्रम होतच राहतील व या सर्व समारंभाचे उत्कृष्ट नियोजन करुन यशस्वी करण्यासंदर्भात आवाहन केले.
त्यानंतर डॉ.केतकी पाटील यांनी स्टुडंट कौन्सीलचे महत्व विषद केले व त्यामुळे गोष्टी करणे सहज साध्य होतात याबद्दल मार्गदर्शन केले व पुढील काळात तुमच्या माध्यमातुन खुप कार्यक्रम होतील याबद्दल ईच्छा व्यक्त केली. डॉ.वैभव पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करतांना त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या समारोपा नंतर स्टुडंट कौन्सीलच्या पदाधिकारी विद्यार्थ्यांसोबत मान्यवराचे फोटो सेशन झाले त्यामुळे विद्यार्थ्यांचा आंनद द्विगुणीत झाला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्टुडंट कौन्सीलचे फॅकल्टी कॉर्डीनेटर प्रा.प्रविण पाटील (चएडअ),प्रा. कोमल इंगळे (एएडअ) , प्रा.आर.व्ही.पाटील (ढएडअ) व प्रा.भावना झांबरे (उएडअ) यांनी प्रा.हेमंत इंगळे (डिन अॅकेडीमिक्स) यांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेतले. कार्यकमाचे सुत्र संचालन रोशनी पाटील (यंत्रविभाग)व नरेंद्र महाजन (ईलेक्ट्रीकल विभाग) या विद्यार्थ्यांनी केले.