जळगाव – केशव स्मृती प्रतिष्ठान व आर. सी. बाफना फाऊंडेशन संचलित मांगिलालजी बाफना नेत्रपेढीच्या २४ व्या वर्धापन दिना निमित्त बाफना नेत्रपेढी, डॉ अनिल आचार्य भवन, मारोती मंदिर, गोलाणी मार्केट समोरील समोर येथे जळगाव शहर व जिल्ह्यातील मधुमेह व इतर आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी रेटीनोपॅथी निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
नाशिक येथील प्रख्यात विट्रेओरेटीना शल्यचिकित्सक डॉ. स्वप्निल विधाते यांनी ३७ रुग्णाची तपासणी केली व त्यांना पुढील उपचारासंदर्भात मार्गदर्शन केले. सकाळी धन्वंतरी पूजनाने नेत्रतपासणीस प्रारंभ झाला. केशवस्मृती प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष निळकंठ गायकवाड, सचिव रत्नाकर पाटील, सदस्य संजय बिर्ला, डॉ धर्मेंद्र पाटील, नेत्रपेढीचे संचालक सचिन चोरडिया, अनुया कक्कड, तुषार तोतला आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते. मांगीलाल बाफना नेत्रपेढीच्या माध्यमांतून आज पावेतो ५२५ नेत्रदान स्विकारण्यात आले असून २३९ व्यक्तिवर नेत्ररोपण करण्यात यशस्वी झाले आहे. शिबीर यशस्वितेसाठी सागर येवले, राजश्री डोल्हारे, किरण तोडकरी, किशोर गवळी, हर्षाली बोरसे यांनी परिश्रम घेतले.