जळगाव – जळगाव मेहरुण परिसरातील शिमा फ़ातेमा सैयद अनसार ही विद्यार्थिनी यूक्रेन येथील नॅशनल मेडिकल विद्यापीठातील इवोनो फ्राक्विस येथे वैद्यकीय शिक्षण घेत असताना युद्ध भडकल्याने तिला भारतात परत यावे लागले अत्यंत कठीण परिस्थितीतून भारत सरकारच्या सहाय्याने ती दिल्ली दिल्लीवरून मुंबई व मुंबईवरून जळगाव ला शनिवारी गीतांजलि एक्सप्रेस ने दुपारी जळगाव रेल्वे स्टेशन वर तिचे आगमन झाले असता तिचे स्वागत जळगाव जिल्हा मुस्लिम मन्यार बिरादरी तर्फे बिरादरी चे अध्यक्ष फारुक शेख, जिल्हाअल्पसंख्यक राष्ट्रवादी अध्यक्ष मज़हर खान, सिकलगर बिरादारीचे अनवर खान, मुस्लिम सेवा संघ चे प्रदेश अध्यक्ष जहांगीर खान,नगरसेविका तथा माजी महापौर सिमा भोले, शिक्षण विस्तार अधिकारी खलील शेख, केंद्र प्रमुख मुश्ताक शेख ताहेर शेख,क्यारम चे राष्ट्रीय खेळाडू योगेश डोंघळे व मोहसिन सैयद,बुद्धिबळ चे प्रवीण ठाकरे, मनियार बिरादारीचे मोहसिन यूसुफ,अलताफ शेख,रफीक शेख,अख्तर शेख,हारिश सैयद,वसीम शेख,आतिफ़ शेख,पोलीस बाईज चे से समीर शेख, व नाशिराबाद येथील सहेरना सैयद,फरहद शेख,आसिम शेख,शहेनाज शेख हे शिक्षक वृंद यावेळी खास उपस्थित होते.
प्राथमिक शिक्षकांची मुलगी
शिमा फ़ातेमा ची आई ही प्राथमिक शिक्षक म्हणून नाशिराबाद येथे कार्यरत आहे शिमा चे माध्यमिक शिक्षण सुद्धा इक़रा हायस्कूल मेहरून मध्येच झालेले आहे शिमा चे वडील सैयद अनसार हे माज़गाव डॉक येथे कार्यरत आहे
सरकारने त्वरित मिशन एडमिशन सुरु करावे
शिमा व या पूर्वी बबीरा चे स्वागत जळगाव करानी उस्फुरतेने केले परंतु यांचे शैक्षिण नुकसान होउ नए म्हणून भारत सरकारने या विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होउ नए म्हणून मिशन एडमिशन ची सुरवात करावी अर्शी लेखी मागणी फारूक शेख यांनी केली आहे