यावल प्रतिनिधी (रवींद्र आढळे) – आजी बाई तुम्ही पण……. असे यावल शहरातील परिक्षा केंद्रावर परिक्षा देण्यात आलेल्या ५२ वर्षिय महिलेस प्रश्न विचारण्यात आला.
तेव्हा होय आपणास पास व्हायचय असे उत्तर आजीबाई कडून मिळाले व त्यानी पेपर सोडवला एकूणच शिक्षणास वय आडवे येत नाही मात्र प्रचंड आत्मविश्वास व जिद्द असल्यास आपण पाहिजे त्या वयात विविध परिक्षा देवू शकतो याचे उदाहरण शुक्रवारी बघायला मिळाले. तसेच यावल तालुक्यात एकुण २७ परिक्षा केद्र आहे व ३ हजार ५०५ विद्यार्थ्यापैकी ३ हजार ४४८ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली आहे. तर तालुक्यातील ५७ विद्यार्थ्यांनी इंग्रजीच्चा पेपरला दांडी मारली
शहरात व तालुक्यात सर्वच परिक्षा केद्रावर सुरळीत व शांततेत परिक्षा पार पडली.