यावल प्रतिनिधी – यावल रावेर तालुक्यात सिंचन विभागामार्फत वनक्षेत्रात,शेती शिवारात नदी नाल्यांवर बांधले जाणारे नालाबांध हे अत्यंत निकृष्ट प्रतीचे बांधकामे होत असल्याने या भोंगळ कारभाराकडे जिल्हा परिषद सिंचन विभाग कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, आणि यावल-रावेर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, बांधकाम शाखा अभियंता, उपविभागीय अभियंता यांचे अर्थपुर्ण दुर्लक्ष होत असल्याने यावल-रावेर तालुक्यातील शेतकरी वर्गासह नागरिकांमध्ये ठेकेदार आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांविषयी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत, याबाबत पंचायत समितीच्या मासिक बैठकीत यावल पंचायत समिती सदस्य शेखर पाटील यांनी लक्ष केंद्रित करून वारंवार तक्रार करून सुद्धा अधिकाऱ्याच्या निगरगट्ट भूमिकेचे एक उदाहरण प्रत्यक्ष समोर आले आहे.
यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील शेती शिवारातील सिंचन विभाग जि.प.जळगाव अंतर्गत बंधाऱ्याच्या कामाची प्रत किती खराब,निकृष्ट प्रतीचे आहे याचा एक व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्याने यावल व रावेर तालुक्यात बांधकाम क्षेत्रात ठेकेदारी वर्गात मोठी खळबळ उडाली. मागील 3 वर्षा पासून यावल पंचायत समिती सदस्य शेखर सोपान पाटील यांनी यावल पंचायत समितीच्या मासिक सभेत विषय उपस्थित करून कार्यवाहीची मागणी करीत आहे परंतु आज पर्यंत कोणत्याही संबंधित अधिकाऱ्यांनी एका बंधाऱ्यांची सुद्धा चौकशी केली नाही व कोणत्याच अधिकाऱ्यांने तक्रारीची दखल घेतलेली नाही, अधिकाऱ्यांना फोन वर बऱ्याच वेळा सांगितले, निकृष्ट कामाचे व्हिडीओ पाठविले परंतु त्यांनी दुर्लक्ष करून संबंधित ठेकेदारास बिलं अदा केलेले आहे, आपण या बंधाऱ्याना खोदा त्या मध्ये काय मटेरियल निघते ते बघा आणि तुमच्या अंदाजपत्रानुसार बांधकाम साहित्य आढळलं तर त्याच्या दुरुस्तीचा खर्च मी स्वतः करेल पण सर्व मिलीं-जुली भगत टक्केवारीच्या माध्यमातून असल्याने आपण सर्व उघड्या डोळ्यांनी बघायचं का? पाणी अडवा पाणी जिरवा या कार्यक्रमांतर्गत शासन एव्हढा मोठा खर्च करते परंतु काही नालायक ठेकेदार व अधिकारी यांच्या खिशात टक्केवारी घालतात किमान शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि भवितव्यासाठी शेतीमाल उत्पादनासाठी थोडीफार लाज वाटत असेल किंवा चिंता असेल तर चौकशी करावी.असे फेसबुक व्हाट्सअप वरून पंचायत समिती सदस्य शेखर पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष केंद्रित केले आहे.