जळगाव – कुल हिंद मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनच्या 64 व्या योम-ए-तासीस निमित्त बुधवारी दुपारी गेंदालाल मिल परिसरात तसेच सिव्हिल हॉस्पिटल व रेल्वे स्टेशन, मेहरूण येथे नागरिकांपर्यंत अन्नप्रदार्थ वाटप करण्यात आले असून चारशे गरजवंत नागरिकांना देण्यात आले. यावेळी विद्यार्थी आघाडीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सनीर सय्यद व इम्रान खान जिल्हा अध्यक्ष युवा ,उत्तर महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी नेहल शेख, जळगाव तालुका सोशल मीडिया प्रभारी अबरार शेख, शहजाद खान स्टुडनेट शाखा सदस्य, कुर्बान शेख स्टुडनेट शाखा सदस्य, मुस्तकीम खान विद्यार्थी शाखा सदस्य, फिरोज शेख, समाज सेवक सईद शाह, वसीम, आरिफ यांची उपथिती होती.