जळगाव – जळगाव मेहरुण परिसरातील बरीरा युसुफ पटेल नावाची विद्यार्थिनी येथील ओझोड विद्यापीठात वैद्यकीय महाविद्यालयात तिसऱ्या वर्षाला शिकत असताना युद्ध भडकल्याने तिला भारतात परत यावे लागले अत्यंत कठीण परिस्थितीतून भारत सरकारच्या सहाय्याने ती दिल्ली दिल्लीवरून मुंबई व मुंबईवरून जळगाव ला बुधवारी राजधानी एक्सप्रेस ने रात्री जळगाव रेल्वे स्टेशन वर आगमन झाले असता तिचे स्वागत जळगाव जिल्हा मुस्लिम मन्यार बिरादरी चे फारुक शेख, ताहेर शेख, जुलकर नैन,अमरुल्लाह सय्यद, शहा बिरादरीचे अनीस शाह, शेख सय्यद बिरादरीचे समीर शेख व काज़िम सय्यद, खाटीक बिरादरीचे यूसुफ ताहेर खाटीक, तसेच भारतीय जनता पार्टीचे आमदार राजूमामा भोळे, शहराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, डॉ राधेश्याम चौधरी, नगरसेवक विशाल त्रिपाठी तसेच इक़रा महाविद्यालयातील शिक्षक वृंद यावेळी खास उपस्थित होते.
हिजाबधारी बरीरा चे भारत माता की जय घोषणेसह स्वागत
बरीरा पटेल राजधानी एक्सप्रेस ने उतरताच ती यूक्रेन ते जळगाव हिजाब घालून आली व तिचे स्वागत जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे हे करीत असताना त्यांचे कार्यकर्ते भारत माता की जय, वंदेमातरम, देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो अशा घोषणा देत असतांना एक चांगला संदेश बघणारे ना जात होता.
सदका देऊन बिरदारीने मानले अल्लाह चे आभार
बरीरा ही सुखरूप परत आल्याने मनियार बिरदारीने सदका (दान) त्याच ठिकाणी उपस्थित गरीब व्यक्तिना देऊन अल्लाह चे आभार मानले.