जामनेर प्रतिनिधी – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी वादग्रस्त विधान केले. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवप्रेमींनी जामनेरात राज्यपाल कोश्यारी यांच्या पुतळ्याचे दहन करून बुधवारी निषेध नोंदवला.
जामनेरातील राष्ट्रमाता जिजाऊ चौकात राष्ट्रवादी काँग्रेस, प्रहार जनशक्ती पक्ष, काँग्रेस, शिवसेना, बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा, संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाने राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष केला. राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड, युवा तालुकाध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील, शहराध्यक्ष जितेश पाटील, जिल्हा सरचिटणीस माधव चव्हाण, प्रल्हाद बोरसे, पदवीधर सेलचे डॉ.बाजीराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष जावेद ईक्बाल अब्दूल रशीद, संतोष झाल्टे, उत्तम पाटील, दत्तात्रय नेरकर, सचिन बोरसे, अहेफाज मुल्लाजी, मधुकर तायडे, शिवसेनेचे शहरप्रमुख अतुल सोनवणे, अॅड.भरत पवार, काँग्रेसचे मुसा पिंजारी, गणेश झाल्टे, दीपक राजपूत उपस्थित होते.
केला. राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड, युवा तालुकाध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील, शहराध्यक्ष जितेश पाटील, जिल्हा सरचिटणीस माधव चव्हाण, प्रल्हाद बोरसे, पदवीधर सेलचे डॉ.बाजीराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष जावेद ईक्बाल अब्दूल रशीद, संतोष झाल्टे, उत्तम पाटील, दत्तात्रय नेरकर, सचिन बोरसे, अहेफाज मुल्लाजी, मधुकर तायडे, शिवसेनेचे शहरप्रमुख अतुल सोनवणे, अॅड.भरत पवार, काँग्रेसचे मुसा पिंजारी, गणेश झाल्टे, दीपक राजपूत उपस्थित होते.