चोपडा – चोपडा शहरातील महावीर नगर परिसरातील महादेव मंदिर उभारणीसाठी पावन भूमीवर महाशिवरात्री निमित्त महाप्रसाद भंडारा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने सोत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी महादाते संदीप सावळे यांनी ७१ हजार रुपयांची देणगी देऊन मंदीर बांधकामासाठी योगदान दिला. यावेळी साबुदाणा खिचडी, केळी व द्राक्षांचा महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
महाशिवरात्रिचे औचित्य साधून भगवान महादेवाची प्रतिमा पुजन करुन संपुर्ण भारत वासियांचे आरोग्य चांगले राहो ,सुख समृद्धी लाभो अशी प्रार्थना करण्यात आली . महाप्रसादासाठी सामाजिक कार्यकर्ते अनिल तांबेकर यांनी साबुदाणा खिचडी तर सामाजिक कार्यकर्ते मेहमूद बागवान यांचे तर्फे १ हजार ०१ केळीचे तर सिमला फ्रूटचे आसिफभाई बागवान यांच्याकडून द्राक्षे असा त्रिगुणी महाप्रसाद देण्यात आला. यात सर्वधर्म समभावतेचा मेळ घातला गेल्याने कार्यक्रमात मोठा भक्ती भाव दिसल्याने “हम सब एक है” ची प्रचिती दिसून आली.
महाशिवरात्रीचे औचित्य साधत महा दाते संदीप सावळे सपत्नीक आपल्या कुटुंबियांसमवेत ७१ हजार रुपयांची भरीव देणगी पत्रकार महेश शिरसाठ यांच्याकडे देऊन मंदीर बांधकामासाठी मोलाचे योगदान दिले. यावेळी बांधकाम कॉन्टॅक्टर सोपान मराठेसर, शाम बडगुजरसर, डॉ.रविंद्र बडगुजर, देवरे, गोपाल झिपरू मराठे, भटूशेठ सोनार, भारत राजपूत, रवींद्र रामदास बडगुजर, रतिलाल बडगुजर, भटूशेठ बडगुजर ,आप्पा मासरेसर, प्रमोद पाटील ,राजेंद्र बडगुजर, देवांग, प्रा.पियुष चव्हाण, प्रकाश चौधरी, प्रवीण राजपूत, सुरेश पाठक, गणेश पाटील, सुमित सोनार, रोहित सोनार, चेतन राजपूत,शिव मराठे, हरिओम बडगुजर,निखिल बडगुजर आदिंची मेहनत घेतली. यावेळी महिला वर्ग मोठ्या प्रचंड संख्येने उपस्थित होता.