जळगाव – वाशी येथील फोर पॉईंट्स बाय शेराटोन या पंच तारांकित हॉटेल मध्ये यू अँड आय एंटरटेनमेंट प्रस्तुत मिस नवी मुंबई या कार्यक्रमात आर्वी एंटरटेनमेंटचं “लाईफइनस्टाईल” या फॅशन मॅगझीनच्या कव्हर पेजचं लौंचिंग करण्यात आलं. ही मॅगझीन कव्हर लौंचिंग आर्वी एंटरटेनमेंट चे संस्थापक रूपा शास्त्री आणि सी. इ. ओ. डॉ. विजय शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आले. या फॅशन मॅगझीनचं डिसाईन सुराज कुटे यांनी केलं आहे. या मॅगझीन च्या लौंचिंग साठी डॉ. संजीव कुमार, बॉलीवूड अभिनेत्री रोशनी कपूर, कुणाल ठक्कर, सुरेंदर सिंग गुप्ता, हर्मित सिंग गुप्ता, यश शेलार प्रामुख्याने उपस्थित होते. या फॅशन मॅगझीन मध्ये फॅशन आणि चित्रपट सृष्टीतील दिग्गजांबद्दल चे लेख आणि नवं कलाकारांबद्दल ची माहिती संकलित करण्यात येणार आहे.