मेष:- तुम्ही असे कार्य करणार ज्याच्या मुळे तुमची ओळख मोठ्या लोकांशी होणार. नव – नवीन लोकांशी ओळख होणार. नवीन मित्र बनवले जातील.
वृषभ:-कामात पूर्ण दिवस व्यस्त जाईल. कुटुबांची कामात मदत मिळेल. व्यवसायात आर्थिक फायदा मिळणार.
मिथुन:- कामात यश मिळेल. नातेवाईक भेटतील. योग्य मार्गदर्शन मिळेल.
कर्क:- आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. कुटूंबात व्यस्त असाल.
सिंह:- वारसा हक्काच्या कामातून लाभ मिळेल. जवळचा प्रवास हसत-खेळत होईल.
कन्या:- जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. एकाच वेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. कौटुंबिक समस्या हिंमतीने सोडवाल.
तुळ:- आवडते पदार्थ खायला मिळतील. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. मुलांचे वागणे विरोधी वाटू शकते. घरात उगाच चिडचिड करू नका.
वृश्चिक:- आवडीच्या कामांमध्ये व्यग्र राहाल. कौटुंबिक जबाबदारी वाढू शकते. खर्चाला वाटा फुटतील. बोलताना भान राखावे. वस्तूंची आवश्यकता लक्षात घेऊन खर्च करावा.
धनू:- कामातील उत्साह वाढेल. उतावीळपणे निर्णय घेऊ नका. पारंपरिक कामात लक्ष घालावे लागेल. नवीन संधींसाठी काही वेळ द्यावा लागेल. मध्यस्थी कामात फायदा संभवतो.
मकर:- गोष्टींची अनुकूलता समजून घ्यावी. निराशेला बळी पडू नका. जबाबदारीची जाणीव ठेवून वागावे. कामात स्त्री वर्गाचा हातभार लाभेल. धार्मिक कामांत अधिकार वाणीने वावराल.
कुंभ:- श्रम अधिक वाढू शकतात. बौद्धिक थकवा जाणवू शकतो. अतिविचार करणे टाळावे. व्यावसायिक ठिकाणी अनुकूलता लाभेल. सर्वांशी गोड बोलाल.
मीन:- इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. परोपकाराची जाणीव ठेवाल. कामातील बदलांची कुणकुण लागेल. आवडते छंद जोपासावेत. मदतीचा हात पुढे कराल.