Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनावरील माहितीपटाची निर्मिती करून त्यांच्या कविता संगीतबद्ध कराव्यात

सिनेट सदस्य अमोल मराठे यांची मागणी

by Divya Jalgaon Team
March 3, 2022
in जळगाव, शैक्षणिक
0
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनावरील माहितीपटाची निर्मिती करून त्यांच्या कविता संगीतबद्ध कराव्यात

जळगाव – कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनावरील माहितीपटाची (Documentary film) निर्मिती करून त्यांच्या कविता संगीतबद्ध करून सुंदर असा संगीतबद्ध संग्रह (Music album) प्रकाशित करावा अशी मागणी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायूनंदन यांच्याकडे विद्यापीठ विकास मंचच्या वतीने सिनेट सदस्य अमोल मराठे यांनी निवेदनाद्वारे केली.

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या नावामुळे विद्यापीठाला एक नवीन ओळख निर्माण झाली आहे, बहिणाबाईंनी मनुष्य जीवनाचे सार आपल्या कवितांमधून सांगितले असून साधी अक्षर ओळखही नसणाऱ्या एका स्त्रीचे नाव एखाद्या विद्यापीठाला दिले जाणे म्हणजे हे जगातील एकमेवाद्वितीय असे उदाहरण आहे. बहिणाबाईंनी आपल्या अतिशय साध्या सोप्या बोलीभाषेतून माणसाला साक्षात जीवन जगण्याची कलाच जणू सांगितलेली आहे. कवयित्री बहिणाबाईंचे साहित्य म्हणजे आपणा सर्वांसाठी एक अमूल्य असा ठेवा असून त्याचे जतन, संवर्धन आणि प्रसार करून समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. आलेल्या संकटाशी दोन हात करत जीवनाविषयी सकारात्मक दृष्टीकोन देणाऱ्या अशा या महान कवयित्री बहिणाबाईंच्या जीवनावर माहितीपट निर्माण करून खानदेशकन्या बहिणाबाईंचे साक्षात जीवन दर्शन सर्व समाजाला पुन्हा घडवावे, तसेच कवयित्री बहिणाबाईंनी म्हटलेल्या / गायलेल्या कविता, ज्या – ज्या आज उपलब्ध आहेत, त्या सर्व रचना संगीतबद्ध करून कवितासंग्रह तयार करण्याचा उपक्रम आपल्या विद्यापीठाने हाती घेतल्यास आज सोशल मीडियाच्या युगात कवयित्री बहिणाबाईंचे साहित्य, त्यांच्या सर्व रचना समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल. शिवाय आपल्या विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाईंचे नाव देण्यामागचा आपला हेतू सुद्धा सार्थकी लागेल असेही निवेदनात म्हटले आहे. कवयित्री बहिणाबाई यांच्या जीवनावर माहितीपट निर्माण करून त्यांच्या कवितांचा संगीतबद्ध कवितासंग्रह तयार करण्यात यावा अशी मागणी सिनेट सदस्य अमोल मराठे यांनी कुलगुरूंची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली. त्यावेळी विद्यापीठातील कवयित्री बहिणाबाई चौधरी अध्यासन केंद्राच्या माध्यमातून हा उपक्रम हाती घेतला जाईल असे आश्वासन कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायूनंदन यांनी दिले आहे.

Share post
Tags: # सिनेट सदस्य अमोल मराठे#Documentary film#Music album#कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ#कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायूनंदन#खानदेशकन्या बहिणाबाईं
Previous Post

चोपड्यात महावीर नगरात महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसाद

Next Post

मनसे व संतप्त नागरिकांची नगरपालिकेत धडक मध्यरात्री सोडले जाणाऱ्या पाणीची वेळे बदला

Next Post
मनसे व संतप्त नागरिकांची नगरपालिकेत धडक मध्यरात्री सोडले जाणाऱ्या पाणीची वेळे बदला

मनसे व संतप्त नागरिकांची नगरपालिकेत धडक मध्यरात्री सोडले जाणाऱ्या पाणीची वेळे बदला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group