जळगाव – गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार, २३ फेब्रुवारी रोजी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शेगावनिवासी संत श्री गजानन महाराज यांचा आशिर्वाद मस्तकावर असलेले डॉ.उल्हास पाटील यांचा २३ फेब्रुवारी हा जन्मदिवस आहे. त्यानिमित्त गोदावरी फाऊंडेशन संचलित शैक्षणिक संस्थांतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात डॉ.उल्हास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूल जळगाव आणि जीआयएमआरतर्फे पीपीएल क्रिकेट टुर्नामेंट २०२२ ला सोमवार, २१ पासून सुरुवात झाली असून बुधवार, २३ रोजी सकाळी ९ वाजता प्रेसिडेंट टुर्नामेंटने स्पर्धेचा समारोप होणार आहे.
असे आहे नियोजन
बुधवार, २३ रोजी सकाळी ६.३० ते ७.४५ पर्यंत गोदावरी हॉस्पीटल येथे डॉ.उल्हास पाटील उपस्थीत असणार आहे. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील मिनी लॉनवर डॉ.उल्हास पाटील यांचा वाढदिवस बुधवार, २३ रोजी सकाळी ८ वाजता साजरा करण्यात येणार आहे. गोदावरी इंग्लिश मिडीयम, जी आयएमआर, लॉ अॅण्ड सायन्स कॉलेजतर्फे जीईएमएसच्या परिसरात सकाळी ९ ते १०.४५ या वेळेत वाढदिवसाचे सेलिब्रेशन होणार आहे. याशिवाय ११ ते ११.१५ दरम्यान डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज परिसरात संत श्री गजानन महाराज पूजन आणि आरती डॉ.उल्हास पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे. ११.११ ते १.३० हेल्थ सायन्सतर्फे तर २.३० ते ४.३० या वेळेत डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात आदि ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर सायंकाळ ६.३० ते ८ या वेळेत गोदावरी हॉस्पीटल याठिकाण हितचिंतक, स्नेहींसाठी राखीव वेळ आहे.