चाळीसगाव – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवपार्वती नगर चाळीसगाव येथे सविता कुमावत सदस्य- दक्षता समिती चाळीसगाव शिवसेना महिला आघाडी आणि चेतन कुमावत यांनी परिसरातील सर्व नागरिकांना महिलांना एकत्र आणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाआरती चे आयोजन केले.
याप्रसंगी अध्यक्ष म्हणून सुभाष देशमुख व रमेश शिंदे यांची संयुक्तपणे निवड झाली. त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून हेमराज बाविस्कर ( पिंटू दादा बाविस्कर ) लाभले. अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर परिसरातील सर्व महिलांनी महाराजांच्या प्रतिमेला ओवाळून पुजन केले यावेळी महाराजांची किर्तीरुपी आरतीचे गायन करण्यात आले.सुत्रसंचालनाची धुरा गणेश साळुंखे सरांनी सांभाळली आपल्या अनोख्या शैलीत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान याच्या भेटीचा व त्याचा वधाचा प्रसंग सांगितला. यावेळी उपस्थित मनोज राठोड ,राकेश सोनवणे, सतीश सोनवणे ,बापू माळी, राजू चव्हाण ,राजेंद्र पाटील,शशिकांत खैरनार,विजय पाटील,
योगेश मराठे,अजय माळी,अजय पाटील सागर राजपूत, प्रसाद चव्हाण,ओम सोनवणे,निलेश बडगुजर,यश सोनवणे,किरण पाटील,संजय राजपूत,भालचंद्र सोनवणे,आबा झोडगे,पुनम सैंदाणे,वैशाली अहिरे,रूपाली चौधरी,वंदना सोनवणे,शितल पाटील,मनीषा बडगुजर,सुरेखाताई महाजन, अंजली मराठे, मंजूषा पाटील, शितल राठोड, मनीषा सोनवणे, कविता, देसले ताई ,दीपाली ताई शिंपी, रेणुका ,भारती सोनवणे, जयश्री सोमवंशी,ज्योती साळुंखे,प्रदर्शन किशोर बागुल यांनी केले.