यावल प्रतिनिधी – जय नारायण मर्चंट को.ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड यावल यांच्या तज्ञ संचालक पदी ॲड.देवकांत बाजीराव पाटील तज्ञ संचालक पदी दि. 21 जुलै रोजी निवड करण्यात आली.
या संस्थेचे कार्यक्षेत्र यावल तालुका आहे संस्थापक चेअरमन राजेश राणे ,व्हा. चेअरमन रवींद्र पाटील व सर्व संचालक मंडळ यांच्या सर्वानुमते ॲड.देवकांत बाजीराव पाटील यांची निवड करण्यात आली. पाटील यांचे कडे यावल तालुक्यातील युवा उद्योजक युवा राजकीय नेतृत्व म्हणून पाहिले जाते त्यांच्याकडे यावल तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून तर विरावली गावात ग्रामपंचायत सदस्य तर सामाजिक क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष याच बरोबर महाराष्ट्र मानव अधिकार न्याय व सुरक्षा परिषद संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तर ग्राहक संरक्षण फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेश राज्य सचिव म्हणून विविध जबाबदाऱ्या पार पाडत असतांना त्यात नवीन एक संधी जबाबदारी म्हणून जयनारायण मर्चंट को.ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड यावल ज्यांचे तज्ञ संचालक म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल संस्थेचे चेअरमन राजेश राणे, व्हाईस चेअरमन रवींद्र पाटील, संचालक किशोर खंडारे ,अनिल तडवी, राजू लोहार ,वंदना राणे, संगीता धांडे ,अनिल ढाके,ईश्वर बोरसे ,संजय जोगी ,यांचे सह संस्थेचे व्यवस्थापक चंद्रकांत बारी यांनी अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत ॲड. देवकांत पाटील यांनी निवडीबद्दल चेअरमन व्ह.चेअरमन व संचालक यांचे आभार व्यक्त करत केले.