चोपडा, प्रतिनिधी । दि.७ सोमवार रोजी चोपडा येथे दि.बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा चोपडा शहर व चोपडा तालुक्याच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची १२४ वी जयंती साजरी करण्यांत आली.
यावेळी माता रमाई यांच्या प्रतिमा पूजन शहराध्यक्ष भरत शिरसाठ व संगिता शिरसाठ यांच्या हस्ते करून माल्यार्पण केले. त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जीवनपट व कार्यावर प्रा.संजय सांळुखे यांनी मार्गदर्शन करून प्रबोधन केले.रमाई जयंती निमित्त कास्ट्राईब महासंघ व शिक्षक संघटनाचे दिनदर्शिका २०२२चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यांत आले.
सदर कार्यक्रमास शहराध्यक्ष भरत शिरसाठ, उपाध्यक्ष छोटूभाऊ वारडे,देवानंद वाघ, दिपक मेढे,रामचंद्र आखाळे, कांतिलाल सांळुखे,संगिता शिरसाठ,प्रणाली शिरसाठ आदि कार्यकारिणी सभासद बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते.कार्यक्रम प्रास्तविक व सुत्रसंचलन देवानंद वाघ यांनी केले शेवटी आभार रामचंद्र आखाळे यांनी मानले.