यावल (यावल प्रतिनिधी ) – तालुक्यातील एका गावातील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारातील आरोपींवर कठोर शिक्षा व्हावी अशा मागणीचे निवेदन सरपंच परिषद यांच्या तर्फे यावल पोलीस स्थानकाचे पोलिस निरिक्षक सुधिर पाटील यांना निवेदन देण्यात आले.
यावल तालुक्यातील एका गावात १५ वर्षिय अल्पवयीन मुलीवर दोन अल्पवयीन मुले व एक तरुणाने सामुहिक अत्याचार केला या तिन्ही संशयीत आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करावी यासाठी खटला फास्ट कोर्टात मार्फत विशेष सरकारी वकिल अँड उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, पिडीत मुलीला आर्थित मदत देण्यात यावी अशी मागणीचे निवेदन यावल पोलीस स्थानकाचे पो. नि. सुधिर पाटील यांना सरपंच परिषदेचे तालुका सचिव अजय अडकमोल ,
तालुका उपाध्यक्ष सैय्यद असद सैय्यद जावेद , तालुका उपाध्यक्ष भुषण पाटील , महिला तालुका अध्यक्ष अलका पाटील, वढोदे सरपंच संदिप सोनवणे , प्रतिप कोळी , अजय भालेराव , निलेश कोळी , समाधान पाटील, अरुण माळी ,नवाज तडवी आधार खळके ,रामकृष्ण सोळंखे ,वर्षा कोळी, सुनिल कोळी , यांच्चा व्दारे निवेदन देण्यात आले