वॉशिग्टंन : अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा कल ट्रम्प यांच्या बाजुने लागताना दिसत नाहीय. आतापर्यंत लागलेल्या निकालानुसार बायडेन यांन २६४ तर ट्रम्प यांना २१४ इलेक्टोरल व्होट मिळाली आहेत. बायडेन विजयापासून केवळ ६ इलेक्टोरल व्होट दूर आहेत. बायडेन यांनी आपणच विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला आहे. बहुमतासाठी २७० इलेक्टोरल व्होट्सची गरज आहे. बायडेन यांचा व्हाइट हाऊसपर्यंत पोहोचण्याचा रस्ता स्पष्ट दिसतोय. असे झाल्यास या विजयाला ट्रम्प सर्वोच्च न्यायालयात आव्हान देतील. या दरम्यान ट्वीटरने ट्रम्प यांना धक्का दिलाय.अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरकडून धक्का.
मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे अनेक ट्विट दिशाभूल करणारे असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे अनेक तास त्यांच्या ट्वीटवर कोणी कमेंट करु शकत नाही किंवा रिट्वीट देखील करु शकत नाही. निवडणूक निकालांवर प्रश्न उपस्थित करणारे ट्विट ट्रम्प यांनी केले होते. ‘धोकेबाजी थांबवा’ असे यात म्हटले होते. याला ट्विटरने दिशाभूल ठरवले आहे. हे ट्विट पाहीलं जाऊ शकतं पण लाईक किंवा कमेंट केली जाऊ शकत नाही.अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ट्विटरकडून धक्का.
नेवाडामध्येही बायडेन सरशी साधू शकतात असा अंदाज आहे. सहा मते बायडेन यांना नेवाडामधून मिळू शकतात. पण आठवडाअखेरपर्यंत निकाल लागण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, काल ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या विजयाचा दावा केला होता. त्याचवेळी त्यांनी बायडेन आणि डेमोक्रॅटसवर घोटाळयाचा आरोप करत मतमोजणी रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायलयात जाण्याची धमकी दिली होती.
दुसऱ्या दिवशी मतमोजणी सुरु असताना दुसरीकडे सुरक्षेसंदर्भातील चिंता निर्माण झाली आहे. काही ठिकाणी तणावपूर्ण वातावरण आहे. काही शहरांमध्ये ट्रम्प आणि बायडेन समर्थकांमध्ये हिंसक झटापटी झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळेच या परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आल्याचे वृत्त आहे. वॉशिंग्टन, विस्कॉन्सिन, फिलाडेल्फिया, पोर्टलॅण्ड, न्यूयॉर्कसहीत अनेक ठिकाणी बायडेन आणि ट्रम्प समर्थक समोर समोर आल्याचे पाहायला मिळाले.
अजून वाचा
Breaking : डोनाल्ड ट्रम्प यांचं वादग्रस्त वक्तव्य