दुबई | आयपीएलच्या यंदाच्या सीजनमध्ये गतविजेत्या मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा फायनलचं तिकीट मिळवलंय. प्ले ऑफमध्ये दिल्ली विरूद्धच्या सामन्यात दिखामात विजय मिळवत मुंबईने फायनलमध्ये प्रवेश केलाय.
मुंबई इंडियन्स यंदाच्या सीजनमध्ये फायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरलाय. तर मुंबई इंडियन्सने आतापर्यंत सहाव्यांदा फायनलपर्यंत मजल मारली आहे.
दिल्ली विरूद्धच्या सामन्यात मुंबईने 200 रन्सचा पल्ला गाठला. या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सच्या पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे आणि शिखर धवन यांना भोपळाही फोडता आला नाही.
जसप्रीत बुमराह व ट्रेंट बोल्ट यांनी दिल्लीच्या फलंदांजाची पुरती दाणादाण उडवली. दिल्लीला अवघ्या 143 रन्समध्ये गुंडाळत 57 रन्सने सामना जिंकला.