Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

Breaking : डोनाल्ड ट्रम्प यांचं वादग्रस्त वक्तव्य

मास्क घालणारे लोक करोनाग्रस्त असतात; ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद होण्याची चिन्हं

by Divya Jalgaon Team
October 16, 2020
in राष्ट्रीय
0
ट्रम्प यांना दणका! ट्विटर, फेसबुकनंतर आता यूट्यूबचेही अकाऊंट बंद

President Donald Trump speaks at a news conference in the James Brady Press Briefing Room at the White House, Monday, Aug. 31, 2020, in Washington. (AP Photo/Andrew Harnik)

 अमेरिका – मास्क घालणारे लोक कायमच करोनाग्रस्त असतात असं वादग्रस्त वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. मियामी या ठिकाणी एनबीसी न्यूजचा एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात त्यांनी हे भाष्य केलं आहे. खरंतर काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीलाही करोनाची बाधा झाली होती.

मात्र यातून ते बाहेर आले. २६ सप्टेंबरला व्हाइट हाउसमध्ये एक कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात आलेल्या लोकांमुळे ट्रम्प यांना करोना झाल्याचं म्हटलं जातं आहे. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या बहुतांश लोकांनी मास्क लावले नव्हते. असं असूनही ट्रम्प यांनी आता मास्क घालणाऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

२६ सप्टेंबरच्या कार्यक्रमानंतरच डोनाल्ड ट्रम्प यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. या कार्यक्रमात आलेल्या अनेक पाहुण्यांनी मास्क घातले नव्हते. त्यांना याबाबत जेव्हा मियामी येथील कार्यक्रमात विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की सतत मास्क घालणारे लोक करोनाग्रस्त होतात. ट्रम्प यांनी केलेल्या या वक्तव्याला कोणत्याही अधिकृत वैद्यकिय संस्थेने पुष्टि दिलेली नाही. अमेरिकेत सध्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत.

त्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी हे वक्तव्य केल्याचं दिसून येतं आहे. करोनाबाबत त्यांनी याआधीही अनेक वक्तव्यं केली आहेत हा चायनीज व्हायरस आहे असंही वक्तव्य त्यांनी जानेवारी महिन्यात केलं होतं. आता सतत मास्क घालणारे लोक करोना संक्रमित असतात असं खळबळ उडवून देणारं वक्तव्य ट्रम्प यांनी केलं आहे. जनसत्ताने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

Share post
Tags: AmericaControversial statementDonald TrumpWashingtone
Previous Post

एटीएम कार्ड क्लोन करण्याचा गोरखधंदा सुरू

Next Post

दिलासादायक ! भारतात रुग्णसंख्येमध्ये होतीये घट

Next Post
जळगाव जिल्ह्यात आज ४६ रूग्ण कोरोनाबाधित; ५ तालुके निरंक

दिलासादायक ! भारतात रुग्णसंख्येमध्ये होतीये घट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group