जळगांव – येथील इकरा शिक्षण संस्था जळगाव व ऑल इंडिया एज्युकेशनल मूव्हमेंट, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने “14वा तालिमी कारवा तर्फे – शैक्षणिक सुधारणा” या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चा सत्र संपन्न झाले. पहिले सत्र इकरा कॅम्पस मोहाडी येथे संपन्न झाले. त्यात इकरा युनानी मेडीकॅल कालेज व इकरा कोविड सेंटर, इकरा बी. एड. कालेज, इकरा डी. एड. कालेज व इकरा पब्लिक स्कूल यांची दिल्ली येथील तालिमी कारवाच्या सर्व सदस्यांनी पाहणी केली. सर्व पाहुण्यांनी इकरा शिक्षण संस्थेने केलेल्या कामांबद्दल गौरव उद्गार काढले व पुढील शैक्षणिक वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
दुसरे सत्र “शैक्षणिक सुधारणा” या विषयावर इकरा एच. जे. थीम महाविद्यालयात संपन्न झाले. कार्यक्रमाचा प्रारंभ प्रा. मुजम्मिल काजी यांनी तिलावते कुराण-ए-पाक ने केला. त्यानंतर संस्थेचे गीत ‘तराना-ए-इकरा’ शहबाज अब्दुल रशीद सालार यांनी सादर केले.
कार्यक्रमात दिल्लीचे संपादक सय्यद मंसूर आगा, प्रा. अब्दुल कय्युम अन्सारी, सुप्रीम कोर्टचे वकील एम. असलम अहेमद, प्रा. अख्तर अन्सारी, मोहम्मद इलियास, अलहाज अहेमद घौरी, महेर आगा, जकीया परवीन तसेच बीड चे मो. सफी अनवारी यांची प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. अब्दुल करीम सालार यांनी विषद केली.
चर्चासत्राच्या द्वितीय सत्राचे अध्यक्ष प्रा. अब्दुल कय्युम अन्सारी होते. या सत्रात असलम अहेमद, मोईन अख्तर अन्सारी यांनी मनोगत व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा. अब्दुल कय्युम अन्सारी म्हटले कि, ‘आज विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. शिक्षण उद्देश पूर्ण असावे तसेच उद्देश पूर्ण झाले की नाही त्यासंदर्भात विद्यार्थ्यांचा, पालकांचा, समाजाचा फीडबॅक घेण्यात यावा. नवीन शैक्षणिक धोरणाच्या चांगल्या गोष्टींचा स्वीकार करावा तसेच शिक्षण रोजगारक्षम असावे’ यावर त्यांचा भर होता. ईकरा संस्थेचे सचिव एजाज अब्दुल गफ्फार मलिक यांनी आभार मानले.