यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील भालोद गावात एका अविवाहीत ३१ वर्षीय तरूणाने आजारास कंटाळुन विहीरीत उडी घेवुन आत्महत्या केली. गुरूवारी सांयकाळी या तरूणाने बामणोद रस्त्या लगतच्या शेत विहिरीत उडी घेतली होती व त्याचा शोध सुरू होते. शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह विहिरीत मिळून आला.
भालोद ता. यावल येथील रहीवासी रविन्द्र प्रभाकर जावळे वय ३१ हा तरूण शेतमजुरी करून उदरनिर्वाह करायचा तो गुरूवारी सायंकाळी शेत शिवारात गेला होता व तो परत घरी आलाच नाही तेव्हा त्याचा शोध घेतला असता भालोद – बामणोद स्त्यावरील एकविरादेवीच्या मंदीरा जवळ असलेल्या अशोक चिंतामण चौधरी यांच्या शेतातील विहीरीत आत्महत्या करण्यासाठी विहीरीत उडी घेतल्याचे काही जणांनी सांगीतले तेव्हा गुरूवार पासुन त्याचा विहिरीत शोध घेतला जात होता तेव्हा शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह विहिरीत मिळून आला.आत्महत्या करण्यापुर्वी रविन्द्र जावळे आपल्या अंगावरील कपडे व चप्पल विहीरीच्या काठावर ठेवली होती. तेव्हा या बाबत फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलिस नाईक किरण चाटे करीत आहे. मयत याच्या पश्चात आई, वडील, बहिण, महेणे असा परिवार आहे आजारास कुटांळून तरूणाने आत्महत्या केल्याने गावातुन हळहळ व्यक्त केली जात आहे.