यावल प्रतिनिधी – कोरपावली येथे वर्षिय बादाप्रमाणे हजरत पीर गैबनशह वली यांच्या उर्स निमित्ताने गुरुवारी 6 जानेवारी संदल शरीफचा 7 जानेवारी शुक्रवारी उर्स चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हिंदू मुस्लिम ऐकतेच प्रतीक मानले जाणारे हजरत पीर गैबनशह वली यांचा गावातील मुख्य चौकात एक भव्य साक्षात मदार असून सालाबादप्रमाणे उर्स निमित्त गुरुवारी बाबांच्या मदारवर संदल काढून साध्या पद्धतीत फुल चादर चढविण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यात्रे निमित्ताने सर्व जातीय धर्माचे लोक बाबांच्या दर्ग्यात येऊन फुल चादर चढून आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी शेकडो भक्त बाबांना साकडे घालून मन्त मानून पुढील आयुष्याची वाटचाल करीत असतात परंतु या वर्षी कोरोना संसगर्जन्य आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी यांच्या आदेश्याने जळगाव जिल्ह्यात रात्रीची जमाव बंदी घालण्यात आल्याने सदर नियमांचे पालन करीत पोलीस प्रशासनास सहकार्याची भावना समोर ठेऊन या वर्षी कव्वालीचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती सदर हिंदू , मुस्लिम पंचकमेटीच्या वतीने कळविण्यात आले आहे.
आयोजक सरपंच, उप सरपंच, अन्य सदस्य पोलीस पाटील, उपसरपंच अब्दुल सरदार तडवी पिरण पटेल जलील पटेल, भिकारी आमद तडवी, अजित समशेर तडवी, नारायण अडकमोल, सुनील अडकमोल, रवींद्र तायडे, मूनफ जुमम,महेबूब मुजात, सिकंदर हैदर,गफ्फार नामदार, हमीद सुभान, जलील पटेल,राकेश फेगडे,मा पोलीस पाटील दत्तात्रय महाजन, राकेश महाजन, अजय बढे, तुळशीराम कोळबे, प्रेमचंद महाले, ऍंड रियाज पटेल,किसन तायडे, स्लिम तडवी यांनी कळविले आहे.