Monday, March 30, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

शॉर्टहँड काल, आज आणि उद्या : आव्हाने आणि संधी

राज्यस्तरीय स्टेनोग्राफर्स संमेलन रविवार 2 जानेवारी रोजी

by Divya Jalgaon Team
January 1, 2022
in जळगाव, शैक्षणिक
0
शॉर्टहँड काल, आज आणि उद्या : आव्हाने आणि संधी

जळगाव –  शॉर्टहँड अर्थात लघुलेखन कलेमूळे प्रशासन गतीमान होते. न्यायालये, विविध कार्यालये, संस्थामध्ये स्टेनोग्राफर्स यांचे अनन्य साधारण महत्व आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाचा प्रभाव प्रत्येक क्षेत्रात पडलेला आहे. स्टेनोग्राफर्स कलेवरही त्याचा प्रभाव जाणवतो. नवीन तंत्रज्ञानाच्या बदलत्या प्रवाहात या कलेचे महत्व, भविष्यातील आव्हाने आणि संधी विषयावर राज्यस्तरीय चर्चासत्राचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन प्रथमच केले जात आहे.

शॉर्टहँड कलेचे जनक सर आइजॅक पिटमन यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून प्रथमच ऑनलाईन राज्यस्तर स्टेनोग्राफर्स संमेलनाचे आयोजन रविवार दि. 2 जानेवारी 2022 रोजी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या लघुलेखकांनी हा नाविण्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. या संमेलनात विविध कार्यालयात स्टेनोग्राफर अर्थात लघुलेखक प्रशासनाचा मुख्य आधार म्हणून ओळखला जातो. न्यायालय, विविध शासकीय व निमशासकीय कार्यालये, खाजगी, सहकारी, शैक्षणिक संस्थांमधील स्टेनोग्राफर्स तसेच हा अभ्यासक्रम करीत असलेल्या व करु इच्छिणा·या विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

अनुभवी वक्त्यांचे मार्गदर्शन :
शॉर्टहँड क्षेत्रातील पुढील अनुभवी व तज्ज्ञ अभ्यासकांचे मार्गदर्शन या संमेलनास लाभणार आहे

हेमराज पाटील, पुणे
वरीष्ठ शॉर्टहँड शिक्षक आणि उच्चश्रेणी लघुलेखक, धर्मदाय आयुक्त कार्यालय, पुणे
विषय : शॉर्टहँड कला विकास, विस्तार आणि महत्व.

अॅड. दिलीप देशपांडे, वरीष्ठ स्वीय सहायक, वन विभाग, नागपूर
तथा सरचिटणीस, महाराष्ट्र स्टेट मोफुसील स्टेनोग्राफर असोसिएशन, नागपूर
विषय : स्टेनोग्राफर्स संघटनेचा प्रवास.

डॉ. सोहन चवरे, उच्चश्रेणी लघुलेखक, जिल्हा परिषद, नागपूर
तथा सचिव, महाराष्ट्र स्टेट मोफुसील स्टेनोग्राफर असोसिएशन, नागपूर
विषय : लघुलेखकांचे प्रश्न आणि संघटनात्मक कार्य.

श्री. दत्तात्रेय नारायण वेटकोळी, मुंबई
मा. मुख्य सचिवांचे वरिष्ठ स्वीय सहायक, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई,
विषय: माझा लघुलेखनाचा प्रवास : शॉर्टहँड मध्ये यशस्वी होण्याची तंत्र आणि मंत्रे

उध्दव आढे, उच्चश्रेणी लघुलेखक, सार्वजनिक बांधकाम विभाग, औरंगाबाद
तथा आयटी सेल राज्यस्तरीय प्रकल्प संचालक, महाराष्ट्र स्टेट मोफुसील स्टेनोग्राफर असोसिएशन, नागपूर,
विषय : नवतंत्रज्ञान आणि शॉर्टहँड कलेचे भविष्य.

संमेलन ऑनलाईन पद्धतीने असणार
www.youtube.com/c/infotech4me या युट्यूबचैनलवर लाईव प्रसारण केले जाणार आहे.

कोव्हीडच्या पाश्र्वभूमीवर हे संमेलन ऑनलाईन झुम अॅपच्या माध्यमातून होणार असून त्यासाठी ही लिंक आहे. तरी सर्वांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. सोमनाथ वडनेरे समन्वयक, राज्यस्तरीय स्टेनोग्राफर्स संमेलन यांनी केले आहे.

संमेलनाच्या यशस्वीतेसाठी कबचौउमवि, जळगावचे स्विय सहायक, सौ. प्रज्ञा टोणगांवकर, श्री. गुलाबराव बोरसे, सौ. चित्रांगा चौधरी, श्री. जितेंद्र गोहिल, उच्च श्रेणी लघुलेखक श्री. चंद्रकांत नेरपगार, श्रीमती रेखा तायडे, श्री. प्रकाश वसावे, श्री. भागवत बडगुजर, श्री. रुपेश धुमाळ, श्री. संतोष गव्हाले, श्री. प्रमोद चव्हाण, निम्न श्रेणी लघुलेखक, श्री. दिपक अलाहित, डॉ. सोमनाथ वडनेरे, श्री. गुलाब पाटील, श्री. राजेश बगे, श्री. ईश्वर सामुद्रे, श्री. जगदिश शिवदे, श्री. महेश पाटील, सौ. मिताली देशमुख, श्री. रमेश गांगुर्डे, डॉ. महेंद्र महाजन, श्री. गजानन सावळे, श्री. आय.वाय.पठाण, श्री. सुरेश ढाके, श्री. सुनिल पारिसकर आदि परिश्रम घेत आहेत.

Share post
Tags: #शॉर्टहँड कालआज आणि उद्या : आव्हाने आणि संधी
Previous Post

आजचे राशीभविष्य, शनिवार, १ जानेवारी २०२२

Next Post

ईकरा तर्फे तालिमी कारवाच्या शैक्षणिक सुधारणा विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र

Next Post
ईकरा तर्फे तालिमी कारवाच्या शैक्षणिक सुधारणा विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र

ईकरा तर्फे तालिमी कारवाच्या शैक्षणिक सुधारणा विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group